-परीसरात २० ते २५ बिबट्याचा वावर असल्याचे शेतकरी संपत भुसाळ यांची माहिती.
-महिन्यांत उंबरीबाळापुर परीसरामध्ये ३ बिबट्या जेलबंद
आश्वी संजय गायकवाड एका महिन्याच्या आत संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापुर येथे तीन बिबट्याना वन खात्याने जेरबंद केले असुन अद्याप ही परीसरामध्ये २० ते २५ बिबटे मुक्त संचार करत असुन उर्वरीत बिबटे ही वनखात्याने तत्काळ जेल बंद करावे अशी मागणी उंबरी बाळापुर गावातील समाजिक कार्येकते तसेच शेतकरी संपत भुसाळ यांनी केली आहे.
उंबरी बाळापुर येथील गट नंबर १३३ मधील आबाजी शंकर सारबंदे यांच्या शेतामध्ये ५ ते ६ वर्षाचा एक नर जातीचा बिबट्या दि ३ मे रोजी जेरबंद करण्यात आला त्यांनंतर मेढपाळ संदीप खंडू होडगर यांच्या मेंढीच्या गोठ्या मध्ये शुक्रवार (दि ५ जुन) पहाटे ३ च्या सुमारास बिबट्या ने हल्ला करत जवळपास ११ मेढ्या बिबट्याच्या हल्यात मृत झाल्या तिथे २४ तासाच्या आत एक बिबट्या जेल बंद करण्यात वनविभागाला यश मिळाले तर दुसरा ही बिबट्या दि १८ जुन रोजी रात्री होडगर यांच्या वस्तीवर जेलबंद केला.
मंगळवार (दि. १७ जून) सकाळी ९ वाजेच्या सुमारास कारवस्ती येथील शेतकरी मच्छिंद्र दगडू कालेकर (वय ५६) हे जनावरांनसाठी गिनी गवत तोडत असतांना बिबट्याने प्राणघातक हल्ला करुन जखमी केले. परीसरामध्ये बिबट्याचा वावर जास्त् वाढला आहे व ते आता वन विभागाच्या नियंत्रणा बाहेर गेल्याचे दिसत आहे. पकडलेल्या बिबट्यांना मायक्रो चिफ बसुन त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे शेतकरी प्रकाश उंबरकर यांनी सांगितले.
सकाळी बिबट्या बघण्यासाठी परीसरातील नागरीकांनी मोठी गर्दी केली होती गर्दी आटोक्यात आणण्यासाठी आश्वी पोलीसांना घटनास्थळी बोलविण्यात आले होते. वस्तीवरील काही अतिउत्साही तरूण जेरबंद झालेल्या बिबट्याची छेड काढताना दिसत होते.वास्तविक बघता बिबट्या हा हिस्त्र प्राणी असुन जो वेळीच पकडला पाहिजे छेड काढल्यामुळे बिबट्या हा जास्त हिस्त्र होण्याची शक्यता जास्त असते. तसेच दबा धरून बसलेला बिबट्या लोकांवर हल्ला करू शकतो.यामुळे बिबट्या पकडल्यानंतर त्याचा वन विभाग ताबा घेई पर्य़त शेतकऱ्यांनी वन विभागाला सहकार्य़ करणे आवश्यक असल्याचे आवाहन विभागाकडुन करण्यात आले आहे.
