कर्जुले पठारच्या घटनेमुळे महाराष्ट्रात संगमनेरची नाचक्की; संगमनेरात सर्वपक्षीय रस्ता रोको

Cityline Media
0
-संत व महापुरुषांच्या भूमीत दलित,आदिवासी अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ - शिवाजी ढवळे 

-कर्जुले पठारच्या या घटनेबाबत आजी- माजी आमदारांची मुग गिळीची भुमिका जनतेत नाराजीचा सूर 

संगमनेर प्रतिनिधी नितीनचंद्र भालेराव महाराष्ट्र ही संत,महापुरुषांची भूमी आहे.येथे कोंबड्यासारखे माणसे मारले जात आहेत.संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार येथे जात्यांध मानसिकतेतुन गावगुंडांनी एका आदिवासी महिलेची हत्या शेतात शौचालयास गेल्यामुळे केली सत्ताधाऱ्यांच्या तालावर थयथयाट करणारी पोलिस यंत्रणा मात्र या आदिवासी कुटुंबाची तक्रार दाखल करून न घेता न्यायाधीशाची भूमिका बजावुन अकलेचे तारे तोडत आहे,लोकप्रतिनिधींना शोषित वंचित लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होता येत नाही तेव्हा दलित आदिवासी समाजातील नेत्यांनी आपले शत्रू कोण आहेत हे तात्काळ ओळखावे असे आवाहन करत कोकणगाव येथील युवकांच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी एकलव्य संघटनेचे अध्यक्ष शिवाजी ढवळे यांनी संगमनेर मध्ये निघालेल्या मोर्चा दरम्यान केले.
                                       (छाया-बच्चन भालेराव) 
आदिवासी आणि मागासवर्गीय संघटनांच्या वतीने निषेध मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलन संगमनेर शहरातील बस स्थानकासमोर करण्यात आले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर विविध संघटनांचे कार्यकर्ते एकत्र जमले आणि घोषणाबाजी करत मोर्चा बस स्थानकासमोर आला.या रास्ता रोको दरम्यान झालेल्या सभेत विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कर्जुले पठार येथील घटनेचा निषेध केला.आंदोलकांनी कर्जुले पठार येथील हत्येप्रकरणी वाढीव कलमे लावण्याची,पैशाअभावी उपचार नाकारणाऱ्या खाजगी रुग्णालयांवर कारवाई करण्याची, आरोपींना फाशी देण्याची आणि अत्याचारित कुटुंबाला धमकावणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.तसेच, कोकणगाव येथील युवकांच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली.

पंतप्रधानांनी म्हटले आहे की पहले शौचालय बाद में देवालय तर या आदिवासी कुटुंबाला शौचालय नाकरणाऱ्या शासकीय यंत्रणेतील दोषींवर देखील तात्काळ कारवाई झाली पाहिजे असा संतप्त सूर निघत आहे.

यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी स्थानिक आजी-माजी आमदार या घटनेबाबत बघ्याची भूमिका घेत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. ते या घटनेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला.तालुक्यातील मागासवर्गीय,आदिवासी अत्याचाराच्या घटनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आजी- माजी आमदारांच्या विरोधात नाराजी स्पष्ट दिसत होती

पोलीस उपाधिक्षक डॉ.कुणाल सोनवणे आणि पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी यावेळी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. सुमारे दीड तास चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनानंतर प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.रास्ता रोको मुळे नाशिक पुणे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती.वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या.

या आंदोलनात एकलव्य संघटनेचे अध्यक्ष शिवाजी ढवळे, रिपाई जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, सामाजिक कार्यकर्ते संतोष रोहम,विद्रोही संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप बर्डे,रिपाई तालुकाध्यक्ष आशिष शेळके,
दलित पँथरचे राजू खरात,प्रवीण गायकवाड,बाळासाहेब गायकवाड,मनसे तालुकाध्यक्ष योगेश सुर्यवंशी,प्रदीप थोरात, रिपाई युवा जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे,रिपाई शहराध्यक्ष कैलास कासार,अनिल बर्डे, विजय खरात,मंजाबापू साळवे,आकाश गोडगे,आनंद केदार, देवीदास माळी,लक्ष्मण साठे,माणिक यादव,कुंदन माळी, किरण रोहम,विकास जाधव,शशिकांत दारोळे,योगेश मुन्तोंडे, मधुकर सोनवणे,वंचित बहुजन आघाडीचे अजिज ओहरा,वैभव मोकळ,मधुकर सोनवणे,राम दारोळे,भाऊसाहेब माळी, सिद्धार्थ खरात,बाळासाहेब पवार,पोपट मेंगाळ,संपत भोसले,सागर शिंदे,विशाल वैराळ,बाळू कदम,नानासाहेब कदम,राम शिरडकर,रूपेश राऊत,बाळासाहेब दरेकर, अनिल जाधव,शहनवाज
 बेगमपुरे,गणी मोमीन, रूपाली सोनवणे,पूनम माळी, मंदा पवार आदींसह मोठ्या संख्येने मोर्च्यात विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते युवक,
महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते..                                     (छाया-बच्चन भालेराव)
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!