श्रीरामपूर दिपक कदम येथील दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली विस्थापित व्यापाऱ्यांना पोट भरण्यासाठी पाच फुटाची जागा द्यावी या मागणीचे नुकतेच निवेदन जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया श्रीरामपूर येथे आले असता प्रांत कार्यालय येथे देण्यात आले.
यावेळी त्यांच्या समावेत प्रांत अधिकारी किरण सावंत तहसीलदार मिलिंद वाघ मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप आदी उपस्थित होते त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की ठराविक व्यापाऱ्यांचे अतिक्रमण काढून दुजा भाव केला जो न्याय त्या व्यापाऱ्यांना दिला तोच न्याय आम्हाला द्या!
तसेच श्रीरामपूर प्रमाणेच नेवासामध्ये देखील अतिक्रमण काढली होती परंतु पुन्हा आहे त्या जागेवर पाच बाय पाच च्या छोट्या टपऱ्या करून आहे त्या ठिकाणी सर्व विस्थापित व्यापाऱ्यांना नेवासा मध्ये जागा देण्यात येऊन व्यापाऱ्यांनी व्यवसाय सुरू केले आहे त्याच धर्तीवर श्रीरामपूर मध्ये देखील पाच बाय पाच फूटाची विस्थापित व्यापाऱ्यांना जागा देऊन त्याचे पुनर्वसन करावे कारण तीन चार महिन्यापासून व्यापार बंद झाल्यामुळे विस्थापित व्यापाऱ्यांसमोर रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला असून मुलांच्या शाळा आई-वडिलांचे दवाखाने करणे मुश्किल झाले आहे तसेच बँकेचे फायनान्सचे घेतलेले कर्जाचे हप्ते थकले आहे म्हणून विस्थापित व्यापाऱ्यांचे त्वरित पुनर्वसन करावे अन्यथा श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समिती प्रशासनाच्या विरोधात उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुभाष त्रिभुवन यांनी दिला.
त्यावेळी राहुल शहाणे रईस शेख शाहरुख मन्सुरी फैयाज पठाण किशोर ओझा बॉबी सहानी विशाल साबद्रा बिलाल आत्तार राकेश थोरात किशोर नागरे गोविंद ढाकणे मनोज गायकवाड अकील शेख जाकीर सय्यद तन्वीर शहा कैलास बाविस्कर असलम आत्तार प्रदीप निकुंभ श्रीकांत वाकळे सुरेश ठाकरे रवींद्र कोरडे गणेश पालकर किरण कतारे ताया शिंदे जावेद अत्तार आदी उपस्थित होते
