नाशिक दिनकर गायकवाड - राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त 'संवाद अकॅडमी ऑफ एक्सन्सच्या वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शाहू महाराजांचे जीवनकार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे आणि त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन विद्याथ्यांनी स्वतःचा आणि समाजाचा विकास करावा, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धा माध्यमिक (८ वी ते १० वी) व उच्च माध्यमिक (११ वी व १२ वी) या दोन गटांमध्ये घेतली जाणार आहे. नाशिक शहरातील सर्व विद्यार्थी या निबंध स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. स्पर्धेसाठी प्रवेश मोफत आहे.
गट क्रमांक १ः इयत्ता ८ वी ते १० वी (शब्द गमर्यादः ३०० शब्द) निबंधाचे विषय पुढीलप्रमाणे आहेत. राजर्षी शाहू महाराज एक आदर्श राजा,तसेच शिक्षणासाठी झटणारे राजर्षी शाहू महाराज, किंवा शाहू महाराज आणि सामाजिक समतेचा विचार, तसेच आजच्या तरुणांनी शाहू महाराजांकडून काय शिकावे? यापैकी कोणत्याही विषयावर निबंध लिहिता येईल.
गट २
इयत्ता ११ वी ते १२ वी (शब्द गर्यादाः ५०० वय) गटासाठी राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक सुधारणा कार्य, तसेच शाहू महाराज आणि भारतातील सामाजिक न्यायाच्या गाथा किंवा समानता, शिक्षण आणि लोककल्याण शाहू महाराजांची त्रिसूत्री यापैकी कोणत्याही विषयावर निबंध लिहिता येईल.
स्पर्धकांना आपले निबंध दि. २९ जून रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत संवाद अकॅडमी ऑफ एक्शन्स, नाशिक येथे येऊन लिहावे लागतील त्यासाठी नोंदणी आवश्यक असून स्पर्धकांनी आपले नाव, शाळा, महाविद्यालयाचे नाव ही माहिती ८५५१९९९६०७ या क्रमांकावर
व्हॉट्सॲपद्वारे पाठवून पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे.पूर्व नोंदणी शिवाय स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.
विजेत्यांना पारितोषिके प्रथम पारितोषिकः ५,००० रुपये, द्वितीय पारितोषिक ३,००० रुपये, तृतीय पारितोषिक २,००० रुपये यासह सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यांला प्रमाणपत्र देण्यात येईल,
संवाद ॲकेडमीचे संचालक विलास निकुंभ यांनी नाशिक शहरातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात मोठा संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन केले आहे.
