सरकारने बच्चु कडू यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा तिव्र आंदोलन

Cityline Media
0
-श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने
-बच्चु कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला जाहीर पाठिंबा.
-तहसीलदारांना निवेदन.
राहुरी प्नतिनिधी सरकारने बच्चू कडू यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात.. अन्यथा, तीव्र आंदोलन करण्यात येईल असे प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे वतीने राहुरीचे तहसीलदारांना यांना निवेदन देण्यात आले.
प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे प्रमुख चंद्रकांत कराळे, देवळाली प्रवरा शहर प्रमुख प्रकाश वाकळे, राहुरी फॅक्टरी महिला शहर प्रमुख रजनी कांबळे, देवळाली प्रवरा शहर संपर्क प्रमुख गणेश भालके, शहर संघटक प्रभाकर कांबळे आदी उपस्थितीत होते.राहुरीचे तहसीलदार यांच्या वतीने निवासी नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी निवेदन स्विकारले.

दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी आणि विविध समाज घटकांच्या अनेक मागण्या घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू, हे राष्ट्रसंतांच्या समाधीस्थळी गुरुकुंज मोझरी येथे मागील पाच दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत.

त्यांच्या मागण्या अतिशय रास्त असून त्या सर्वसामान्य लोकांच्या हिताच्या आहेत.परंतु राज्य सरकार हे निगरगट्ट झाले असून त्यांना सर्वसामान्य माणसांच्या समस्या, अडचणी व प्रश्नांसोबत काही घेणे देणे राहिलेले नाही. त्यामुळे सध्या शेतकरी बांधव आणि सर्वसामान्य जनता अतिशय त्रस्त असून सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे.

आणि जनता सरकार विरोधात संताप व्यक्त करीत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व कार्यकर्ते सुद्धा सरकारच्या या जनविरोधी भूमिके विरुद्ध महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन करून आवाज उठवत आहे. सामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी आदरणिय बच्चू कडूनी घेतलेल्या निर्णयाला आमचे समर्थन असून सरकारच्या चुकीच्या धोरणा विरोधातील त्यांच्या जनआंदोलनाला श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील तमाम प्रहार कार्यकर्त्यांच्या वतीने आंदोलनाला जाहीर पाठिंबा असून सरकारने मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अन्यथा श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रहार कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निवेदनात शेवटी म्हंटले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!