दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते उद्घाटन

Cityline Media
0
मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क भारतीय संसदेच्या अंदाज समितीच्या स्थापनेच्या अमृत महोत्सवी ( ७५व्या ) वर्षानिमित्त, संसद व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश विधि मंडळांच्या अंदाज समित्यांच्या दोन दिवसीय  राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन नुकतेच लोकसभा अध्यक्ष.ओम बिर्ला यांच्या हस्ते व मुख्यमंत्री.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री.एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
यावेळी संसदीय अंदाज समितीच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त 'कमिटी ऑन एस्टिमेट्स,पार्लमेंट ऑफ इंडिया (१९५० - २०२५)' या स्मरण पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

 या ऐतिहासिक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी, राज्यसभेचे उपसभापती.हरिवंश जी, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर,लोकसभा अंदाज समितीचे अध्यक्ष.डॉ. संजय जैसवाल, विधान परिषदेच उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष.अण्णा बनसोडे यांच्यासह आदी मान्यवर,लोकसभेतील अंदाज समितीचे सदस्य खासदार व देशभरातून आलेले विविध राज्यातील अंदाज समितीचे प्रमुख व समिती सदस्य उपस्थित होते.

 या ऐतिहासिक परिषदेच्या निमित्ताने, महाराष्ट्र विधान परिषदेचा सभापती म्हणून आलेल्या सर्वांचे स्वागत करून सुशासनाच्या दिशा ठरवणाऱ्या मुद्द्यांवर मनोगत व्यक्त करण्याचा सन्मान लाभला.


 या वेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सुशासन परंपरेचा संदर्भ देत, त्यांच्या 'भिलकौडी' प्रयोगाच्या माध्यमातून संवेदनशीलतेने चालविलेल्या जनकल्याणकारी प्रशासनाचे उदाहरण मांडले. भारतातील संसदीय लोकशाही व्यवस्था ही जबाबदारी, सहकार्य, पारदर्शकता, आणि नैतिक मूल्यांवर आधारित आहे. याच मूल्यांची जपणूक करून विधिमंडळ समित्यांच्या कामाला अधिक कार्यक्षम व परिणामकारक करण्याची गरज या परिषदेत अधोरेखीत केली. तसेच, विधीमंडळातील समित्यांचे कार्य हे सल्लागार, सकारात्मक समीक्षा करणारे, लोकहिताचे प्रभावी साधन कसे ठरू शकते, याविषयी विचार मांडले.

या परिषदेचा उद्देश,संसदेच्या अंदाज समिती व राज्यांच्या संबंधित समित्यांच्या कार्यपद्धतीत समन्वय, पारदर्शकता, आणि उत्तरदायित्व वाढवणे हा असून, देशातील लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणीस चालना देणे हा यामागील मुख्य हेतू आहे.. असे मत महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी व्यक्त केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!