नाशिक दिनकर गायकवाड शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते तथा नाशिक मनपा म्युनिसिपल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी नुकताच भाजपात प्रवेश केल्यानंतर संघटना देखील भाजपच्या हाती गेल्याने नुकतेच राज्याचे जलसंपदामंत्री भाजपचे संकटमोचक निरीष महाजन यांनी नाशिक महानगरपालिकेत जनसंघटनेच्या कार्यालयाला भेट दिली.
यावेळी बडगुजर यांनी त्यांचा सत्कार करून स्वागत केला. नाशिक महानगरपालिकेतील कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटीबद्ध राहू, असे आश्वासन महाजन यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. यावेळी देवानंद बिरारी, सोमनाथ कासार, स्वी एरंडे, तुषार बकोलिया, विजय साने, दिलीप दातीर, सुनील केदार, उपासनी आदी उपस्थित होते
