डि पॉल हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात

Cityline Media
0
श्रीरामपूर: दिपक कदम-येथील विन्सेन्शन मिशन सर्विस सोसायटी संचलित डि पॉल इंग्लिश मिडीयम हायस्कूलमध्ये नुकताच आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रसंगी इ.पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांना योगा प्रशिक्षक पुजा जतिन सोलंकी यांनी बहुमोल मार्गदर्शन केले.यावेळी कु.वृंदा संतोष सोले(इ.आठवी) हिने विद्यार्थ्यां समोर ताडासन, भुजंगासन,वृक्षासन, पवनमुक्तासन,मकरासन, हनुमानासन,भुमासन, नटराजासन,पादहस्तासन, वज्रासन,वक्रासन, अर्धचक्रासन,शलभासण, त्रिकोणासन या आसनांची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांची मने जिंकली. 

दरम्यान विद्यार्थ्यांनी सदर आसनांची प्रात्यक्षिके सादर करत योगा दिनाचे महत्त्व जाणून घेतले.यावेळी कार्यक्रमास संस्थेचे व्यवस्थापक फादर सिजो,प्रशासक फा.फ्रँको, प्राचार्या सिस्टर ब्लेसा,समन्वयक सि. रेन्नी,सचिव मॉली कुथूर, वरिष्ठ लिपिक रवी लोंढे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मॉली कुथूर यांनी केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!