पोहण्याच्या नादात पाण्याचा अंदाज न आल्याने वालदेवी धरणात तरुण बुडाला

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाले यांना आलेल्या पुरामुळे वालादेवी धरणामध्ये एक जण बुडून वाहून गेल्याची घटना घडली आहे. अंधार झाल्यामुळे शोध कार्य थांबविण्यात आले आहे.
दिवसभर मृग नक्षत्राच्या पावसाने मोठ्या प्रमाणावर नाशिक जिल्ह्यास झोडपले असून त्यामुळे दिवसभर जिल्ह्यातील नागरिकांची चांगलीच धावपळ वपळ झाली. त्यामुळे जनजीवनही विस्कळीत झाले. शहरामध्ये सुरू असलेल्या या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आणि दुतोंड्या मारुतीच्या छाती एवढे पाणी लागले आहे. शहरातील भांडी बाजार पूर्णपणे विस्कळीत झाला होता सराफ बाजाराच्या कोपऱ्यापर्यंत पाणी पोहोचले होते.

दरम्यान झालेल्या पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील विहीर येथे भार मध्ये दारणा धरणातून सोडण्यात आलेले पाणी घुसल्यामुळे या परातील संसारोपयोगी साहित्याचे पूर्णपणे नुकसान झालेले आहे. त्याबाबतचे पंचनामा करण्याचे आदेश इगतपुरी तहसीलदारांनी दिले आहेत. सालदेवी घरी पाच वाजेच्या सुमारास पिंपळद येथील ३५ वय असलेला युवक  जालिंदर रामदास फळ हा पाण्यामध्ये पोहण्यासाठी गेला असताना तो वाहून गेला

माहिती मिळाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्याचे काम सुरू होते परंतु अंधार पडल्यामुळे हे शोध कार्य थांबविण्यात आले असून आले आज सकाळपासून है शोधकार्य पुन्हा सुरू झाले असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!