नाशिक दिनकर गायकवाड रामनगरी ते अलकानगरी वेवदूत या पुस्तकाचे प्रकाशनाने संस्कृत साहित्याच्या क्षेत्रात महत्वपूर्ण पाऊल पडले असल्याचे प्रतिपादन डॉ. मंगला मिरासदार यांनी केले.
संस्कृत भाषा सभेच्या कार्यदर्शिनी सरिता देशमुख यांच्या "रामनगरी से अलकानगरी मेघदूत परिचय' या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच कुर्तकोटी सभागृह येथे फर्क्युसन महाविद्यालयाच्या माजी संस्कृत विभागप्रमुख आणि अभ्यासक डॉ. मंगला मिरासदार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाला संस्कृत भाषाचे अध्यक्ष रमेश देशमुख, रथ पी. टी. महाविद्यालयाच्या संस्कृत विभागप्रमुख लीना हुअरगीकर, गौतमी प्रकाशनाच्या संचालिका सानिका देशमुख, नितिक प्रिंटचे संचालक नरेंद्र शालिग्राम, योगेश गायधनी, रमेश देशमुख, शोभा सोनवणे व डॉ. मुक्तेश्वर मुनीका हे व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रमुख अतिथी डॉ. मंगला मिरासदार यांनी आषाढाचा पहिला दिवस' या विषयावर आधारित
कालिदासाच्या 'मेघदूत' या कलाकृतीचा अत्यंत कथक आणि विस्तृत पद्धतीने परिचय करून दिला. संस्कृत भाषा सभेच्या सरिता देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी प्रमुख पाहुणे व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन कवी कालिदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्मिता आपटे यांनी आरती गाऊन वातावरण प्रसार केले.
या पुस्तकाने संस्कृत साहित्याच्या क्षेत्रात एक महत्वपूर्ण पाऊल टाकले असून, 'मेघदूत' या कालिदासाच्या काव्यकृतीच्या याच्यात समाविष्ट केली आहे. असेही.मंगला
मिरासदार यांनी आपल्या भावना व्यक्त करून पुस्तकाच्या लेखिका सरिता देशमुख यांचे अभिनंदन करतानाच देशमुख यांनी सहस्रदर्शनात पदार्पण केल्याने त्यांचा पुष्पगुछ व यायेची शाल देऊन सत्कार केला. श्रोत्यांनी हे पुस्तक विकत घेऊन संस्कृत भाषेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी सल्लागार सदस्य डॉ. मुक्तेश्वर मुगशेट्टीवार यांनी सर्वांचे स्वागत केले कार्यक्रमाचे अध्यक्ष सविता देशमुख यांनी संस्कृत भाषा सभेचा इतिहास सांगून संस्थेने प्रकाशित केलेल्या पुस्तकांची माहिती प्रास्ताविकात दिली. प्रमुख अतिथी गुच्छ देऊन सत्कार केला.
प्रमुख अतिथींचा परिचय अलका चंद्राचे, तर लेखिका सरिता देशमुख यांचा परिचय शोभा गोलवणे यांनी करून दिला.
पुस्तकांचा परिचयात्मक आढावा व लेखिका सरिता देशमुख यांचा साहित्यिक का संस्कृत भाषा जागृतीचा परिचय डॉ. लीना हुजस्तीकर यांनी करुन दिला, तर सत्कारार्थीच्या वतीने योगेश गायधनी नरेंद्र शास्त्री यांनी मनोगत सनी नागरे यांनी केले, तर कार्य सदस्य साधना गोखले यांनी आभार सन्मान करण्यात आला आणि कार्यक्रम ऐक्य मंत्राने पार पडला
