नगरपालिकेच्या तलावात संडासचा मैला सोडणाऱ्या कुटुंबावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी
श्रीरामपूर दिपक कदम शहराला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या नगरपालिकेच्या तलावात पिण्याचे पाणी वाहणाऱ्या सिमेंटच्या पाईपलाईन मध्ये संडासचा मैला सोडणाऱ्या,खोडचाळपणा करणाऱ्या कुटुंबावर फौजदारी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल करावे या मागणीचे निवेदन नुकतेच रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये शिवसेनेचे नेते संजय छल्लारे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजीत लिपटे संदीप पवार भीम आर्मीचे सचिन ब्राह्मणे बहुजन समाज पार्टीचे सुरेश कांबळे यांच्या हस्ते मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की संपूर्ण श्रीरामपूर शहरामध्ये दूषित पाणी येत असल्याबाबत श्रीरामपूर नगर परिषदेला अनेक नागरिकांनी बऱ्याच दिवसापासून तक्रारी केल्या होत्या त्या तक्रारीची दखल घेऊन नळाला दूषित पाणी का? येते याचा शोध पाणीपुरवठा विभागाचे
अधिकारी घेत असताना त्यांना एका भागामध्ये श्रीरामपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात वाहणाऱ्या मुख्य पाईपलाईन मध्ये दोन तीन- कुटुंबांनी संडासचा मैला पाईपलाईन मध्ये सोडल्याचा किळसवाणा गंभीर संतापजनक चिड आणणारा भयंकर
माणुसकीला लाजवेल असा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला त्यानंतर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना कळविले त्यानंतर संबंधित कुटुंबावर फौजदारी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल करायला पाहिजे होते परंतु
तसे न करता त्यांना फक्त नोटीस देऊन त्यांना पाईपलाईन मध्ये सोडण्यात येणाऱ्या मैला बंद करण्यास सांगितले त्यामुळे त्या कुटुंबांनी तो मैला सोडायचे बंद केले परंतु गेली अनेक वर्षापासून त्या लोकांनी त्या ठिकाणी संडासचा मैला सोडल्यामुळे
श्रीरामपूर शहरातील सर्व नागरिक मैला मिश्रित दूषित पाणी पिले आहे याला जबाबदार कोण अनेक वर्षापासून चाललेल्या या निच कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे म्हणून ही बाब अत्यंत चिंताजनक खेदजनक किळसवाणी असून संपूर्ण श्रीरामपूर शहराला दूषित
पाणी पाजून लोकांना रोगराईच्या घाईत लोटणाऱ्या कुटुंबाने संताप जनक प्रकार केलेला आहे कारण संपूर्ण श्रीरामपूर शहरातील लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वच लोकांनी कित्येक दिवसापासून ते मैला मिश्रित पाणी प्राशन केले आहे असा प्रकार देशात कुठे घडला नसेल
इतका मोठा महाभयंकर प्रकार श्रीरामपूर शहरांमध्ये घडलेला आहे जनावराला सुद्धा लाजवेल असा भयानक प्रकार आहे म्हणून त्या कुटुंबावर श्रीरामपूर नगर परिषदेने फौजदारी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात येऊन त्यांना तुरुंगात टाकावे अन्यथा नगरपालिकेवर मोठा जन आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा सुभाष त्रिभुवन गौतम यांनी दिला आहे.