संगमनेर संपत भोसले-: लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त नुकतेच कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक सभागृह, या ठिकाणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भरत रसाळे यांचे "लोकराजा राजश्री शाहू महाराज समजून घेताना" या विषयावर जाहीर व्याख्यान झाले, यावेळी राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय, रूकडीचे प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे यांना राजर्षी शाहू जीवन गौरव पुरस्कार तसेच सामाजिक क्षेत्रातील उमलते संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी येथील युवा नेतृत्व आणि शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष राहुल बाजीराव ढेंबरे पा. यांना राजश्री शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रकाशक व दिग्दर्शक अनिल म्हमाने हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.किसन कुराडे,डॉ. सोमनाथ कदम, भरत लाटकर, डॉ.श्रीपाद देसाई, डॉ. शोभा चाळके आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून तसेच विश्वासराव तरटे, निवेदक अर्हंत मिणचेकर, किशोर पोवार, दिनकर लोहकरे, राजेंद्र बस्ते, बाजीराव ढेंबरे
आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
राजश्री शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आल्याबद्दल शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे सर्वच पदाधिकारी,आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि मित्र परिवार तसेच नातेवाईकांनी शिवश्री.राहुल बाजीराव ढेंबरे पाटील यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.