राहुरी प्नतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील शितलनगर,टेंभुर्णी येथे समाधान गुरव यांचे इमारतीत भाड्याने घेतलल्या घरात राहणारे पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार (वय ३३, राहणार सोलापूर),राजेंद्र कोंडीबा चौघुले (वय ४२,कर्जत जिल्हा अहिल्यानगर), तात्या
विश्वनाथ हजारे (वय ४० पाटेगाव तालुका कर्जत) होंडा शाईन एम एच ४५ वाय ४८३३) या मोटर सायकलने अहिल्यानगरहून राहुरी कडे येत असताना पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व त्यांच्या पोलीस पथकाने २८ जून रोजी रात्री ९.३० वाजनेचे सुमारास पकडले.
आरोपीकडून पाचशे दोनशे रुपयांच्या नोटासह बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे झेरॉक्स मशीन,कटिंग मशीन, कागद, संगणक आदि असे एकूण ७०,७३,९२० किमतीच्या बनावट चलनी नोटा जप्त केल्या.