यावेळी झालेल्या शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व सांस्कृतिक मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे संपर्क मंत्री नामदार शंभूराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत व संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ व नेवासा
विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या उपस्थितीमध्ये अहमदनगर शहरातील दक्षिणेतील शेकड समर्थकासह शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला असून यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दक्षिण अहिल्यानगरचे जिल्हाप्रमुख बाबू टायरवाले शहर
जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे उत्तरेतील जिल्हाध्यक्ष कमलाकर होते नितीन औताडे अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाप्रमुख किशोर वाघमारे सुभाष आल्हाट संदेश कारले दादासाहेब शेळके आनंद शेळके प्रकाश कुलट श्रीधर शेलार शरद झोडगे संपर्क प्रमुख सुरेखा
गव्हाणे महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सुनीता शेळके नगरसेवक सचिन जाधव संभाजी कदम युवा अध्यक्ष महेश लोंढे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख शुभम वाघ मंजाबापू साळवे दिनेश फटांगरे माजी महापौर सुरेखा कदम प्रथम नागरिक माजी महापौर शैलासाई शिंदे रोहिणी शेंडगे
आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत रावसाहेब पाटील काळे यांनी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत शिवसेना पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला असून यापुढील काळामध्ये दक्षिण अहमदनगर जिल्ह्यामध्ये गाव तिथे शिवसेनेची शाखा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार सामान्य नागरिकांसाठी व वापरलेल्या सर्व योजना घराघरांमध्ये पोहोचवण्याचे काम रावसाहेब काळे यांनी केले.
माझी बहीण लाडकी युवकांसाठी बेरोजगारांसाठी मेळावे कामगारांच्या प्रश्नावर काम करणारा असल्याचे त्यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना बोलले यावेळी येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पक्षाचा उमेदवार जास्तीत जास्त मतांनी निवडून येईल .
आगामी येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये अहिल्यानगर मध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा कसा फडके यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रावसाहेब पाटील काळे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर बोलताना मनोगत व्यक्त केली यावेळी आहिल्यानगर जिल्ह्यातून शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिवसेनेचे संपर्क मंत्री नामदार शंभूराजे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला सर्व शिवसैनिकांना भावी कार्यास शुभेच्छा देत शिवसेना सदस्य अभियानासह पक्ष वाढीसाठी काम करावे व शिवसेना पक्ष घराघरांमध्ये पोहोचवा अशी शुभेच्छा दिल्या.
