प्रमोद नारायण पराड यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९६७ रोजी मुंबई नायगाव येथे झाला असून ते ब्रिटिशकालीन बी.डी.डी. चाळीत राहात आहे. त्यांचे शिक्षण नायगाव, मुंबई येथे महापालिका शाळेमध्ये झाले आणि पुढील शिक्षण देखील मुंबई मधेच पूर्ण केले. त्यांचे मूळ गाव खिरविरे, तालुका अकोले, जि.अहिल्यानगर येथे आहे.
त्यांच्या वडिलांचे नाव नारायण पराड त्यांचे कुटुंब पहिल्यापासून मुंबईला राहत होते.
त्यांचे आजोबा श्रीपत बाबाजी पराड आंबेडकर चळवळीमध्ये काळाराम मंदिर व महाड सत्याग्रह यामध्ये सक्रिय सहभागी होते आणि ते राहत असलेल्या बी. डी. डी.चाळी मध्ये डॉ.बाबासाहेबांचे सहकारी भिमराव धोंडीबा कर्डक हे जलसा समाज प्रबोधन करीत होते. भिमराव धोंडीबा कर्डक यांचे नांव चौकास देण्याबाबत प्रस्ताव देऊन त्यांची मुंबई महापालिकाकडून मंजूरी घेतली व सामाजिक प्रेरणास्थान निर्माण केले या दोघांची प्रेरणा आणि वारसा घेऊन प्रमोद पराड हे आंबेडकरी चळवळीमध्ये पुढे सक्रिय झाले.
-आंबेडकरी चळवळ
स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि न्याय,या तत्त्वांवर आधारलेली जाती व्यवस्थेच्या विरोधी चळवळ आणि आंबेडकरी विचार फक्त एकाच प्रकारचे बदल, परिवर्तन व क्रांती अशीच कल्पना न मांडता पूर्ण परिवर्तनाचा व्यापक विषय घेऊन चळवळीत सहभागी झाले. समाजावरील होणारे अन्याय अत्याचार विरोधी लढा देण्याचे काम ते आजतागायत करीत आहेत.
-अंधश्रद्धा निर्मूलन
समाजात अंधश्रद्धा बोकाळली होती गरीब अशिक्षित अडाणी समाज याला बळी पडला होता यातच भर म्हणून शेतात मोलमजुरी करणाऱ्या शेतमजुरांची खूप पिळवणूक होत होती हे सर्व पाहून त्यांच्यासाठी झटावे असे प्रकर्षाने प्रमोद पराड यांना जाणवले या अडाणी लोकांना शिक्षित करण्यासाठी त्यांनी नगर जिल्हा परिषद गावात शैक्षणिक व समाज प्रबोधनाचे क्लासेस चालू केले आहेत.
-बुद्धिष्ठ सोसायटी ऑफ इंडिया
या संस्थेमध्ये गेली ३५ वर्षे सल्लागार म्हणून काम करीत आहेत. बुद्धांच्या सामाजिक आणि नैतिक शिकवणींचा प्रसार करणे,धार्मिक प्रवचन, महापुरुषांची जयंती, परिसंवाद, धम्म सहल यांचे आयोजन करून विविध समाज उपयोगी उपक्रम राबवित आहेत.
किशोर वाघमारे-संगमनेर
