श्रीरामपूर दिपक कदम येथील याज्ञी बडदे हिने इंडियन आर्मी हिस्टॉरिक रण व नगर सायकलिंग क्लब यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या रनिंग स्पर्धेत भाग घेत तीन किलोमीटर ऊर्जा रण या महिला विभागामध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याने तिचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
व्यायामाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने आयोजित या स्पर्धा एक जून रोजी भोईकोट किल्ला आर्मीच्या प्रांगणात पार पडल्या. त्यामध्ये ३ ,५ ,१०, ३१ व ४२ किलोमीटर धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती स्पर्धेत जिल्ह्यातून २२८० स्पर्धकांनी भाग घेतला होता.
यामध्ये तीन किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत साधारण २५० खेळाडूंनी भाग घेतला होता त्यामध्ये याज्ञी बडदे हिने तीन किलोमीटरचा टप्पा २४ मिनिट ५५ सेकंदामध्ये पार करून जिल्हास्तरीय मध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
हे यश संपादन करताना तिला तिचे वडील सचिन बडदे, डॉ. संकेत मुंदडा ,डॉ. जया तलरेजा, क्रीडा प्रशिक्षक श्री.आहेर तसेच क्रीडा प्रशिक्षक श्री बलराज यांचे अनमोल मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले
