कोल्हार प्रतिनिधी राहता तालुक्यातील कोल्हार मध्ये क्रुझर आणि नेक्सन या वाहनांची समोरासमोर धडक ही प्रवरा नदीच्या पुलावरून भीषण अपघात घडला यामध्ये १२ जण जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी प्रवरा हॉस्पिटल लोणी येथे पाठवण्यात आले.
सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार क्रुझर क्रमांक के ए४९एम२५४६ ही नगर कडून शिर्डीच्या दिशेने जात असताना ,शिर्डी कडून नगर कडे जाणारी नेक्सन क्रमांक एमपी०७एक्सझेड ४२३० या वाहनांची समोरासमोर धडक होऊन होऊन भीषण अपघात झाल्याची घटना आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झाली .हा अपघात इतका भीषण होता की अपघात झाल्यानंतर क्रुझर ही रस्त्यावर पलटी झाल्याने क्रुझरमधील असणाऱ्या व्यक्तींना जबर दुखापत झाली. यानंतर मोठा आवाज झाल्याने स्थानिक नागरिकांनी घटनेस्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले. यानंतर काही काळ नगर-मनमाड महामार्गावर वाहतुकी विस्कळीत झाली होती त्यानंतर स्थानिकांनी दोन्ही वाहने बाजूला घेऊन महामार्ग खुला करून दिला. जखमींमध्ये काही महिलांचाही समावेश असून त्यांना देखील उपचारासाठी प्रवरा हॉस्पिटल लोणी येथे पाठवण्यात आलेले आहे.
