खासदार संजय राऊत यांच्या दौऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी बडगुजरांकडून नाराजी
नाशिक दिनकर गायकवाड- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोमवारच्या भेटीनंतर उबाठाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी पक्षसंघटनेतील फेरबदलांबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. संघटनात्मक बदल करताना विश्वासात न घेतल्याने आपल्यासह १० ते १२ जग नाराज आहेत. पुढे काय होईल ते येणारा काळच सांगेल, अशा शब्दांत बडगुजर यांनी पक्षफुटीचे संकेत दिले आहेत.
येत्या आठवडाभरात शिवसेना ठाकरे पक्षात मोठा राजकीय भूकंप होण्याचे भाकित भाजपचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी वर्तविले होते. त्यामुळे आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुक पार्श्वभूमीवर राजकीय भूकंप होणार
असल्याची जोरदार चर्चा होत आहे.त्यामुळे फोडाफोडीच्या राजकीय हालथालींना पुन्हा सुरुवात होत आहे. विशेषतःमहायुतीने नाशिकातील शिवसेना ठाकरे गट संपविण्याचा जणू निर्धारव केला आहे.काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे माजी आमदार नरेंद्र दराडे, उपनेत्या निर्मला गावित यांनी शिंदे गटात प्रवेश करत उबाठाला हादरा दिला.
खरे तर त्याच सुमारास गटातील अन्य नाराजांचाही पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा होती, मात्र तो निर्णय लांबणीवर पडला.खा. संजय राऊत नाशकात आले की राजकीय भूकंप होतो ही जणू परंपराच महायुतीने कायम ठेवत ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के देणे गुरू केले आहे. आता विवाह सोहळ्यांच्या निमित्ताने नाशिकमध्ये आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दीयानंतर खा. राऊतही नाशकात येऊन गेल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा खिंडार पडणार हे आता दिसू लागले आहे.शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी काल सकाळी खा संजय राऊत यांचा हॉटेल एसएसके येथे पाहुणचार केला तर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे नाशिक महानगराप्रमुख विलास शिंदे यांच्या कन्येच्या लामाला हजेरी लावल्याने ठाकने गटाचे हे दोन्ही शिलेदार पक्षाला पक्का देणार याची चर्चा सुरू झाली आहे. आता बडगुजर यांनी पक्षसंघटनेतील
बदलांबाबत उघडपणे व्यक्त केलेल्या नाराजीनंतर या शक्यतेला बल प्राप्त झाले आहे.
एवढयावरच हे प्रकरण थांबले नाहीत तर पक्ष सोडणार का अशी विचारणा केली असता उद्याचे आपण सांगू शकत नसल्याचे बडगुजर यांनी सांगितले, त्यामुळे नाशकात खा. राऊत यांच्या दौऱ्यानंतर पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाला जोरदार धक्का बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दख्यान, सर्व घडामोानिंतर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख डी.जी. सूर्यवंशी यांनी तातडीची बैठक घेऊन पक्षाची भूमिका मांडली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र शिवसेना ठाकरे गटातून एक नव्हे तर अनेक नेते, शिवसैनिक दुसऱ्या पक्षात जाणार असल्याचे उघड झाले आहे.
