मुंबई प्रतिनिधी राज्यातील महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत घेण्यात आला.
राज्यातील सर्व शासकीय कार्यालये भाड्याच्या जागांवर न राहता स्वमालकीच्या इमारतींमध्ये स्थलांतरित करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात यावी,यासाठी आवश्यक निधीची तरतूद करून इमारतींच्या बांधकामाला प्राधान्य देण्यात यावं.
राज्यात ज्या ठिकाणी विकासकामं सुरु आहेत, त्याठिकाणी नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, त्यादृष्टीनं कामांचं, वाहतुकीचं नियोजन करून ठरलेल्या वेळेत गतीनं कामं पूर्ण करण्याचे निर्देश बैठकीत दिले.
मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वाची असणाऱ्या ‘अहिल्यानगर-बीड-परळी’ रेल्वेच्या कामाला गती देण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या
पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असणाऱ्या शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो,पुणे मेट्रो १ व २ मार्गिकेच्या कामाचा आढावा घेतला.कोकणाच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या रेवस ते रेडी किनारा महामार्गाच्या कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या. याचबरोबर लोणावळा येथील
स्कायवॉक आणि टायगर पॉईंट विकास, सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालय,अलिबागच्या उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,पुणे बाह्यवळण रस्ता,वडाळा येथील जीएसटी भवन, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे, ‘सारथी’संस्थेचे छत्रपती संभाजीनगर,
नाशिक, कोल्हापूर, नागपूर, खारघर, अमरावतीतील ‘सारथी’च्या विभागीय उपकेंद्रांचं बांधकाम,औंध-पुणे येथील नियोजित एम्स हॉस्पिटल, रत्नागिरी येथील मिरकरवाडा बंदर विकास, मुंबई येथील रेडीओ क्लब जेट्टी, नेरळ-शिरुर-कर्जत रस्ता, सातारा सैनिक स्कूल,
परळी बीड) येथील शासकीय पशूवैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथील शासकीय पशूवैद्यकीय महाविद्यालय, पुरंदर विमानतळ, बारामती विमानतळ, बीड विमानतळ, पुणे येथील कृषीभवन, ऑलिम्पिक भवन, कामगार कल्याण भवन, नगररचना भवन, सहकार भवन, नोंदणीभवन, पुणे येथील वीर लहूजी वस्ताद स्मारक, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे वढू आणि तुळापूर येथील स्मारक, फुलेवाडा स्मारक आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला.