टेनिस व्हॉलीबॉल राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर

Cityline Media
0
निवड चाचणीला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी मुंबई दिपक कदम: २७ वी राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा भाटपारा, छत्तीसगड येथे २६ ते ३० जून २०२५ या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड प्रक्रिया टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशनच्या मान्यतेने व नवी मुंबई टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनच्या संयोजनातून, कोपरखैरणे येथील क्राईस्ट अकॅडमी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे यशस्वीरित्या पार पडली.
या निवड चाचणीला नवी मुंबई, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, परभणी, हिंगोली, पुणे, नाशिक, अमरावती आदी जिल्ह्यांमधून आलेल्या ज्युनिअर व सब-ज्युनिअर गटातील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने टेनिस व्हॉलीबॉल खेळाचे जनक व्यंकटेश वांगवाड यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले, तर क्राईस्ट अकॅडमी स्कूलचे संचालक फादर जेसन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे मनोबल उंचावले.

या निवड प्रक्रियेला महाराष्ट्र टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनचे राज्य सचिव गणेश माळवे, राज्य उपाध्यक्ष कोरडे, राज्य कोषाध्यक्ष डॉ. दिनेश शिगारम, बालभारती तज्ञ प्रगती भावसार, नवी मुंबई सचिव वैभव शिंदे, तसेच अशोक शिंदे, आशिष ओबेरॉय, सचिन भोसले आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडलेला महाराष्ट्र संघ पुढीलप्रमाणे :
ज्युनिअर मुले :कृष्णा अहिरे, विवेक साळुंखे, प्रसाद महाले, मयूर बोरसे, प्रताप पौळ, अनंत धापसे
सब-ज्युनिअर मुले :ईश्वर मोरे, दिव्यांशु चांद, वेदांत महामाने, गौरव चौधरी, मयूर निकम, विर पाटील
ज्युनिअर मुली :वेदिका बेंद्रे, मृणाली सरवदे, श्रेया सिंग, सृष्टी शिंदे, मान्यता जैन, अंकिता सरगर
सब-ज्युनिअर मिश्र दुहेरी :राजवीर भोसले, सोनाक्षी कदम.

ज्युनिअर मिश्र दुहेरी :शिवम कदम, श्रेया धावन
प्रशिक्षक : उज्वला शिंदे, शिवदास खुपसे, गणेश आम्ले
संघ व्यवस्थापक -निलेश माळवे अशा पद्धतीने निवड करण्यात आली आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!