नाशिक येथे हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र २१००० वृक्षारोपण करण्याचा निर्धार
नाशिक प्रतिनिधी सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात यांच्या प्रेरणेतून जयहिंद लोकचळवळने संगमनेर तालुक्यात दंडकारण्य अभियान ही चळवळ सुरू केली. आजपर्यंत कोट्यावधी वृक्षांची लागवड करण्यात आली.
आता ही चळवळ राज्यभर विस्तारत आहे.याच प्रेरणेतून आज नाशिकमध्ये.भरत आंधळे, अति.आयकर आयुक्त, नाशिक यांनी पुढाकार घेत हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र २१००० वृक्षारोपण करण्याचा निर्धार केला. यावेळी जयहिंद लोकचळवळने या उपक्रमास मार्गदर्शन केले.
सिन्नर तालुक्यातील ठाणगांव, बेलटेकडी डोंगरावर २१००० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.मालपाणी ग्रुप संगमनेर यांच्या वतीने या उपक्रमास अर्थसहाय्य करण्यात आले. यावेळी डॉ. प्रवीण गेडाम (विभागीय आयुक्त नाशिक), . जी. मल्लिकार्जुन (मुख्य वन संरक्षक नाशिक),गजेंद्र हिरे (उप वनसंरक्षक वन्यजीव, नाशिक) उमेश वावरे (उप वनसंरक्षक, नाशिक पूर्व),. सिध्देश सावर्डेकर (उप वन संरक्षक, नाशिक पश्चिम) हे उपस्थित होते.