३९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
नाशिक दिनकर गायकवाड - मुंबई नाका परिसरातील गुलशन कॉलनीतील घरफोडी प्रकरणी रेकॉर्डवरील चार चोरट्यांना जेरबंद करण्यात आले असून, त्यांच्या कडून ३८ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ व २ च्या पथकाला यश आले आहे.
याबाबत माहिती अशी, की दि. २४ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई नाका परिसरातील गुलशन कॉलनी येथे बंगला फोडून अज्ञात इसमांनी त्यामधील सोन्या चांदीचे दागिने व रोकड चोरून नेली होती.या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटवे यांनी गुन्ह्यातील आरोपींचा शोध येऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. गुन्हे शाखा युनिट-१ व २ चे अधिकारी अंमलदारांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली.
त्यात दोन संशयित घरफोडी करून जाताना दिसले. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस हवालदार महेश साळुंके, राहुल लोखंडे, गुन्हे शाखा युनिट-२ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, हवालदार महाजन यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे त्र्यंबकेश्वर दरम्यान एमएच ०५ ईजे ४२९८ या क्रमांकाची एर्टिगा कार सापळा लावून पकडली.त्यात संशयित नाबिद अल्ताफ हाश्मी (वय २५, रा.द्वारका, नाशिक), शहबाज जावेद खान (वय २९, रा. वहाळा रोड, नाशिक), उत्तम धोंडीराम मुंजे (वय ३०, रा. पेगलवाडी, ता. त्र्यंबकेश्वर) व महेश मधुकर व्यवहारे (वय २७, रा. भांगरे गल्ली, त्र्यंबकेश्वर) यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून ३६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, २०४ ग्रॅम बांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली वाहने व मोबाईल असा एकूण ३८ लाख ५८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,
पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, पोलीस निरीक्षक मधुकर कड, हेमंत तोडकर, हिरामण भोये, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, पोलीस हवालदारा महेश साळुंके, रमेश कोळी, राहुता पालखेडे, आप्पा पानवळ, मुक्ता शेख, राम दहें, विलास चारोस्कर, किरण शिरसाठ, देवीदास ठाकरे, योगीराज गायकवाड, उत्तम पवार समाधान पवार, सहाय्यक पोलीसा निरीक्षक समाधान हिरे, प्रकाशा महाजन, अतुल पाटील, मनोज्जा परदेशी, करके, शेळके आदीनी केली