ठाणे विशाल सावंत- ठाणे येथील किसननगर १ मधील नंदादीप बिल्डिंगचा स्लॅप मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास अचानक कोसळला.रहिवाशांची त्रेधातिरपीट झाली, सर्वत्र घबराटीचे वातावरण पसरले होते अनेक कुटुंबियानी जीव मुठीत घेऊन सकाळ होण्याची वाट बघितली यावेळी मदतीचे आवाहन करण्यात आले होते
शिवसेनेचे पालघर विधानसभेचे आमदार रवींद्र पाठक यांनी सकाळी तात्काळ जाऊन त्यांची भेट घेऊन पाहणी केली.आणि तेथील स्थानिक राहिवांशाशी संवाद साधून त्यांना धीर दिला.तसेच रहिवाशांच्या स्थलांतराबाबत निवारा व अन्न- पाण्याची सोयी सुविधा यावर तात्काळ बैठक घेतली.