इंस्टाग्राम आयडी न दिल्याने नाशकात मुलाला जिवे मारण्याचा प्रयत्न

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड 
इन्स्टाग्राम आयडी देत नाही माणून तिघांनी एका मुलाच्या मानेला धारदार शस्त्र लावून त्याचा खून करण्याचा प्रयान केला.हा प्रकार लक्षात आल्याने भद्रकाली पोलिसांच्या त्रिवेणी गार्डन दोन बिट मार्शलने यात मुलाची सुटका केली याप्रकरणी आरोपी फरीद मन्सुरी यास अटक करण्यात आली असून, त्याच्याबरोबर दोन जणास ताब्यात घेतले आहे.
याबाबत माहिती अशी,की भद्रकाली पोलीस ठाण्यांतर्गत संतोष आव्हाड व अझरुद्दीन इनामदार हे काल गस्त घालत असताना तेथील एका पुलाखाली पाच मुलांचा आरडाओरडा ऐकू आला बीट मार्शल पोलिस येताच एका मुलाने दुसऱ्या मुलाच्या मानेला शस्त्र लावल्याचे दिसले.बीट मार्शलने तातडीने घटनास्थळी जाऊन संशयित आरोपीना पळून जाग्याची संधी न देता शस्त्रसह तिघांना ताब्यात घेतले व संभाव्य खुनाच्या गुन्ह्याला प्रतिबंध करता दोन पीडित मुलांची सुटका केली. या सर्वांना गुन्हे शोध पथकाच्या मदतीने पोलीस ठाण्यात आणले असता पीडित मुलगा सौरभ सुनील मौर्या (वय १०, रा. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) व त्याच्यासोबत असलेला साहिल शेख (ह. नानावली) यांचे 

आयडीवर आठ लाख फॉलोवर्स आहेत तो इन्स्टाम आयडी देत नसल्याने आरोपी फरीद मन्सुरी (वय १९) व त्याच्या दोघां मित्रांनी, साथीदारांनी सौरभला जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्र  ठेवून त्याला मारहाण केली.

या प्रकरणी आरोपीसह दोन बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गुन्हे शोध पथकाचे पो. नि. सत्यवान पवार व सहकारी करित आहेत. पीडित

मुलांना वेळीच मदत केल्याबदल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक परिमंडळ-१ चे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सरकारवाडा विभागाचे सहायक आयुक्त नितीन जाधव,भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पारील कॉन्स्टेबल संतोष आव्हाड, अझरूद्दीन इनामदार, शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, उपनिरीक्षक दीपक लोंढे, हवालदार संदीप शेळके नरेंद्र जाधव, लक्ष्मण ठेपणे, कॉन्स्टेबल जावेद शेख व नारायण गवळी यांचे अभिनंदन केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!