दोन दुकानदारांविरुद्ध गुन्हा दाखल
नाशिक दिनकर गायकवाड केशरी व पिवळ्या शिधापत्रिका धारकांसाठी शासकीय योजनेनुसार वितरण करण्यासाठी देण्यात आलेल्या ३३ क्विंटल गहू व ५० क्विंटल तांदूळ असा एकूण ८३ क्विंटल धान्याचे वाटप न करता त्याचा अपहार करणाऱ्या दोन रेशन दुकानदारा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विलास पार्वता लक्ष्मण कनोजे (रा. विवेकानंदनगर, मखमलाबाद, नाशिक) हे शिधा पत्रिका धारक आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की आरोपी अमोल दिगंबर सदावर्ते (रा. रंगुबाई जुमरे साकेज, रुका) व मुकुंद सुभाष पाटकर (रा. शिवाजीनगर, गांधीनगर, नाशिक) यांचे चौक मंडई
येथील ६९ क्रमांकाचे स्वस्त धान्य दुकान आहे.आरोपी सदावर्ते व पाटकर यांनी संगनमत करून त्यांच्या दुकानात केशरी व पिवळ्या योजनेनुसार वितरित करूयासाठी धान्य देण्यात आले होते.त्या धान्यापायी ३३ क्विंटल ४९ किलो गहू ४९ क्विंटल ९१ किलो तांदूळ असे एकूण असे एकूण ८३ क्विंटल ४० किलो गरजू
शिधापत्रिकाधारकांना वितरित न करता त्याचा अपहार करून शिधापत्रिका धारकांची आणि शासनाची फसवणूक केली. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अमोल सदावर्ते व मुकुंद पाटकर या रेशन दुकानदारांविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल करत आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक वाय, एस.माळी हे करीत आहेत.
