बंदोबस्तासाठी आलेल्या १४ पोलिसांची बस मुंबई आग्रा महामार्गाच्या दुभाजकावर आदळल्याने जखमी

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड दुभाजकावर बस धडकून झालेल्या अपघातात बंदोबस्तासाठी आलेले १४ पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना मुंबई-आग्रा महामागौवर घडली.
फिर्यादी खुशाल सीताराम गायकवाड (रा. कुमसाही, ता. कळवण) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की फिर्यादी यांच्यासह १३ पोलीस कर्मचाऱ्यांची सिद्धिविनायक चौकातील कृष्णाई लॉना येथे मुक्कामाची सोय करण्यात आली होती. या ठिकाणी जाण्यासाठी फिर्यादी यांना व त्यांच्यासोबतच्या लोकांना जाण्यासाठी बयवस्था नसल्याने आडगाव ठुक टर्मिनस येथे पोलीस बंदोबस्तासाठी असलेली एमएच १२ व्हीव्ही २४३० या क्रमांकाची आयशर पोलीस व्हॅन सोडण्यासाठी उपलब्ध करून दिली ही बरा फिर्यादी गायकवाड व त्यांच्यासोबत

१३ सहकारी असे सर्व मिळून कृष्णाई लॉन्स येथे मुक्कामासाठी जात होते. ओझरकडून नाशिककडे जात असताना मुंबई-आग्रा महामार्गावर पाऊस सुरू असल्याने रसयावरील दुभाजक बसचालकाच्या लक्षात आला नाही. त्यामुळे भरधाव वेगात असलेली बस आदळून अपघात झाला. त्यात खुशाल गायकवाड, हितेश बारसे, आश्विन नङगे, उत्तम कव्हाण, तुकाराम बारेला, भाई हरवटे, विनोद मोहरणकर, सिद्धार्थ सवार प्रमोद शेळके, महेश तुंबडा, प्रवीण चौरे, छोटेलाल अबिरवाड, राहुल बोरा य अविनाश गाडे हे पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणी आयतरचालक ज्ञानदेव जोपळे विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!