नाशिक दिनकर गायकवाड बसमध्ये चढ़त असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधील बारा तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना मेळा बसस्थानकात पडली.
फिर्यादी स्वाती किरण महाले (रा. गुंजाळवाडी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) या काल (दि. १७) गावी जाण्यासाठी मेळा बस स्थानकात आल्या होत्या.त्या बरामध्ये बढत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन महाले यांच्या पर्स मधील १ लाख ५ हजार रुपये
किमतीचा ३५ ग्रॅम वजनाचा राणीहार, १ लाख २ हजार रुपये किमतीची ४० ग्रॅम वजनाची सोन्याची लांब पट्टी, ३० हजार रुपये किमतीच्या १० मि वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या व ३० हजार रुपये किमतीची १० ग्रॅम वजनाची चेन, १५ हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे टॉपा व ७२ हजार रुपये किमतीच्या २४ ग्रॅम वजनाच्या बांगड्या असा एकूण लाख ७२ हजारांचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डंबाळे करित आहे
