पुणे सिटीलाईन न्यूज नेटवर्क पुणेरी पालकांच्या आग्रहास्तव दादाभाऊ भोसले प्रतिष्ठानच्वया वतीने श्रीधर भोसले यांनी पुण्यात १४ जून रोजी न्यू लाईफ सेंटर मध्ये १६१ व्या ख्रिस्ती वधू-वर परिचय मेळाव्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते,
या सामाजिक उपक्रमाचे उदघाट्न सेंट विनसेन्ट कॉलेजचे प्राचार्य डॉ. अनिल अडसूळे यांच्या हस्ते झाले. प्रत्येक भूमिका पार पाडणारी आणि घर सांभाळणारी आई प्रत्येकाला उत्तम संस्कार देत असते, म्हणून तिचा आदर प्रत्येकानें ठेवला पाहिजे असे प्रतिपादन अडसुळे यांनी केले आहे.
यावेळी ॲड. प्रसाद सांगळे यांनी उपस्थित पालकांना सामुदायिक विवाह सोहळ्याचे महत्व पटवून सांगितले तर महेश बेंजामीन यांनी मेळाव्याची ही सामाजिक चळवळ ख्रिस्ती धार्मियांना संघटित ठेवणारी असल्याचे नमूद केले. सेवानिवृत्त पर्यवेक्षक प्रदीप कदम यांनी एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे सविस्तर पटवून दिले.
मान्यवर सुरेंद्र लोंढे यांनी त्यांच्या मुलीचे लग्न भोसले प्रतिष्ठानाच्या मदतीने झाल्याचे ऐतिहासिक अनुभव कथन केले.यावेळी पुण्यासह संभाजीनगर, अहिल्यानगर, दौंड, नाशिक इत्यादी ठिकाणाहून आलेल्यांची उपस्थिती १४५ हुन अधिक दिसून आली.
प्रास्ताविक डॉमनिक कदम यांनी केले तर संयोजक श्रीधर भोसले यांनी सूत्रसंचालन केले. स्यामुएल जाधव यांनी आभार मानले.
