आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे ३ ते ४ बिबट्याचे उपद्रव मूल्य वाढले असून वनविभागाकडे वारंवार येथील शेतकऱ्यांनी पिंजरा लावण्याची मागणी केली होती येथील मेंढपाळ संदिप खंडू होडगर यांच्या मेंढ्यांच्या गोठ्यावर तसेच कोंबडी पोल्ट्री फार्मवर हल्ला करणाऱ्या एका बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले आहे परंतु तिथे भटकणाऱ्या बिबट्यांनी संदिप होडगर यांच्या अडीज लाखाच्या पशुधनाचे नुकसान केले आहे.
सविस्तर माहिती अशी की, शेतकरी संदीप खंडू होडगर यांनी गाय शेळ्या प्रमाणेच जवळपास ३५ मेंढ्या बॅकेचे कर्ज काढून विकत घेतल्या. २० बाय २० च्या उघड्या आणि मुक्त शेड, तसेच जवळच असलेल्या पोल्टी फॉम मध्ये काही मेंढ्या होत्या तसेच १०० हून अधिक कोंबडया होत्या. या बिबट्यांच्या हल्यात ११ मेंढ्या मृत झाल्या असुन ५ ते ६ मेंढया ह्या अद्यापही मृत्युशी झुंज देत आहे. तसेच जवळपास ३० ते ३५ कोंबड्या ही बिबट्याच्या हल्यात मृत झाल्या. या घटनेत मेंढपाळाचे अडीच लाखाचे नुकसान झाले असून ही घटना शुक्रवारी (दि ५ जुन) पहाटे ३ च्या सुमारास घडली होती.
वनविभागाने वेळीच पिंजरा लावुन बिबट्यास जेरबंद केले असते तर या शेतकरी मेंढपाळाचा तोडचा घास हिसकावला गेला नसता?
वनविभागाचे संगमनेर भाग २ चे वनपरिमंडळ अधिकारी रमेश पवार यांना घटनेचे गांर्भिये लक्षात येताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पिंजरा लावण्याची तत्परता दाखविली त्यामुळे घटनेच्या २४ तासाच्या आत एक बिबट्या हा लावलेल्या पिंजऱ्यात बंद झाल्यामुळे शेतकरी संदिप होडगर यांनी तात्पुरते श्वास घेतला असला तरी अद्याप ही ३ ते ४ बिबटे परीसरामध्ये मुक्त संचार करत असुन अधिक पिंजरे लावण्याची मागणी शेतकरी तसेच ग्रामस्थ करत आहे आता जर वनविभागाने चालढकल केली तर उर्वरित बिबट्यांचे उपद्रव मूल्य वाढत जाऊन पशुधनाबरोबर मनुष्य हानी होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.
बिबट्यांचे उपद्रव मूल्ये रोखू-वनाधिकारी
-घटनेचे गंभीरता लक्षात घेता तसेच परीसरामध्ये अजुन काही बिबटे मुक्त संचार करत असल्याचे दिसते त्यामुळे आवश्यकतेनुसार अधिक पिंजरे लावण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसात यांबद्दल अंमलबजावणी करण्यात येईल.
रमेश पवार, वन परिमंडळ अधिकारी, संगमनेर शाखा २ वनविभाग संगमनेर
