संतप्त नागरिकांचा सवाल
श्रीरामपूर दिपक कदम येथील जुन्या तहसीलच्या आवारात जप्त केलेल्या वाहनांचे पुढे काय? असा संतप्त सवाल येथील नागरिक विचारत आहे.जुने तहसील तालुका ग्रामीण पोलिस ठाण्याच्या आवारात वाळू मुरूमने भरलेल्या जप्त केलेल्या ट्रक टेम्पो आयशर जीप ट्रॅक्टर आदी वाहनाने तहसीलचे आवार पूर्णपणे भरले असून इथे दुचाकी वाहन लावण्यास सुद्धा जागा नाही.
तहसीलच्या आत व बाहेर दंड केलेल्या वाहनांची संख्या अधिक आहे--या ठिकाणी तालुका पोलीस ठाणे अप्पर अधीक्षक कार्यालय खरेदीखत जुने रेकॉर्ड तहसील अभिलेख कक्ष कार्यालय महिला मंडळ ऑफिस ट्रेझरी ऑफिस सिटी सर्व्ह पंचायत समिती कार्यलय यांचे कार्यालये आहेत.
त्यामुळे पकडलेल्या वाहनांमुळे इथे इतरांना दुचाकी गाडी लावण्यास तसेच सरकारी वाहने लावण्यास सुद्धा जागा शिल्लक राहिलेली नाही--तेव्हा या वाहनांचे पुढे काय होणार याचा लिलाव होणार की नाही ही जागा केव्हा मोकळी करणार असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.
