नाशिक दिनकर गायकवाड सुरगाणा येथे आदिवासी पँथर संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी प्रा.तुळशीराम खोटरे याच्या नेतृत्वाखाली बोरगाव ते बर्डिपाडा राज्य महामार्गावर भर पावसात दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.
आदिवासी विकास विभाग अंतर्गत कंत्राटी १७९१ शिक्षक भरती जीआर / निर्णय तात्काळ रद्द करावा,आदिवासी आश्रमशाळांमध्ये अत्यंत कमी मानधनावर प्रामाणिक काम करत असलेल्या रोजनदारी कर्मचाऱ्यांना विनाअट शासन सेवेत समायोजन करावे, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी,पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत जाचक अटी रद्द करून वंचितांना घरकुल मिळावे,
आदिवासी मुला-मुलींकरिता उंबरठाण, पांगारणे येथे आदिवासी वसतिगृह उभारावे, पांगारणे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकाम करावे, पळसन येथील बंद पडलेले उधोगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) चे काम तात्काळ सुरु करावे, सर्व रेशनकार्ड धारकांना मोफत धान्य मिळावे, आदी विविध मागण्यांसाठी पांगारणे येथे बोरगाव ते बर्डिपाडा राज्य महामार्गावर आदिवासी पॅथरचे प्रा. तुळशीराम खोटरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी संततधार पावसात
दीड ते दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी पोलिस निरीक्षक, तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनामुळे रास्ता रोको आंदोलनामुळे रस्त्यावर दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी प्रा. तुळशीराम खोटरे यांनी सांगितले की, आदिवासी विकास विभाग मधील बाह्यप्रक्रिया नोकर भरती रद्द करून रोजनदारी कर्मचारी यांना कायम करावे.अन्यथा, आदिवासी आयुक्त कार्यालय नाशिक येथे बेमुदत आंदोलन
करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी गोदुणेचे संरपच संजाबाई खंबाईत, सदस्य सुभान गागोडा, रवि गागोडा, विठ्ठल गवळी, हिरामण वाघमारे, महेंद्र राऊत, भास्कर पवार, रमेश चौधरी, चिता वार्डे, प्रकाश वार्डे, नितेश गावित, माधव चौधरी, सुरज वाघमारे, रमेश कुवर, गंगाराम खोटरे, संजय चौधरी, डिगबर चौधरी याच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.