कृषी पर्यटन केंद्रातील भेटीने विद्यार्थ्यांचा कृषी व निसर्ग अभ्यास
संगमनेर नितीनचंद्र भालेराव इनोव्हेटर्स पब्लिक स्कूल,चंदनापुरी या शाळेची एक दिवसीय वनभोजन सहलीचे आयोजन करण्यात आले होते. संगमनेर तालुक्यातील मोधळवाडी निसर्गरम्य परिसरात या वनभोजन सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
परिसरातील कृषी पर्यटन केंद्रास देखील यावेळी भेट देण्यात आली.क्षेत्रभेट सहल' ही एक शाळेच्या चार भिंतींपलीकडे जाऊन अध्ययनाची क्रिया आहे.ज्यातून विद्यार्थ्यांना उत्साह,आनंद तर मिळतोच,त्याचबरोबर या क्षेत्रभेटीतून विद्यार्थ्यांची नव - नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळते.
तसेच कौशल्य विकसित होतात. विविध संकल्पनांचे ज्ञान विद्यार्थी यातून आत्मसात करतात.इनोव्हेटर्स पब्लिक स्कूल, चंदनापुरी नेहमीच विद्यार्थ्यांची कौशल्य विकसित करण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासावर अधिकाधिक भर देत असते.ही बाब लक्षात घेता मोधळवाडी, संगमनेर या ठिकाणी इयत्ता नर्सरी,ज्युनियर केजी,सिनिअर केजी,पहिली व दुसरी या वर्गांचे क्षेत्रभेटीचे नियोजन करण्यात आले होते.
कृषी पर्यटन केंद्रास भेट देऊन विद्यार्थ्यांना विविध पक्ष्यांची माहिती,निसर्गातील झाडे, वनस्पती,फुले यांची माहिती देण्यात आली.निसर्गातील या संबंधित गोष्टींचा चार भिंतींच्या बाहेर राहून मागोवा घेतला.या क्षेत्रभेटीत विद्यार्थी उत्साही तर होतेच त्यांच्या आनंदाला पारावर नव्हता.
या सहलीत विद्यार्थ्यांना मोधळवाडी येथे कृषी पर्यटन केंद्रास भेट देण्याची संधी मिळाली.तिथे त्यांनी ऐतिहासिक,भौगोलिक,वैज्ञानिक,निसर्गरम्य स्थळ याविषयी माहिती मिळवली.प्रशिक्षित मार्गदर्शकांनी त्यांना ठिकाणाची संपूर्ण माहिती दिली.विद्यार्थ्या या सहलीत खूप नवीन गोष्टी शिकले.
शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा रहाणे व शिक्षकांनी या सहलीचे उत्तम आयोजन केले होते.विद्यार्थ्यांनी सहलीचा आनंद घेतला आणि भविष्यात अशा सहलींचे आयोजन करण्याची मागणी यावेळी पालकांनी केली. सहलीच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक मनिषा रहाणे यांच्यासह सर्व शिक्षक वृंद,वाहक आदींनी सहल सुखरूप व यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.