नाशिक दिनकर गायकवाड- मनमाड शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारीक, त्यांचे बंधू व पुतण्या यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्या-प्रकरणी रात्री उशिरा मनमाड पोलीस ठाण्यात अल्तमश अल्ताफ शेख (वय २२, रा. मनमाड) याच्याविरूध्द पोलिसांनी प्राणघातक हल्ल्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.
त्याला काल दुपारी मनमाड न्यायालयासमोर उभे केले असता न्यायायालयाने अल्तमश यास तीन दिवसांची
पोलीस कस्टडी सुनावली आहे. दरम्यान अनिल रामेश्वर पारीक (वय ५७) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. अल्तमश याने फिर्यादीच्या मोटारसायकलला धडक मारली. याचा जाब विचारल्याचा राग येवून त्याने धारदार शत्र असलेल्या चाकूने राजेंद्र पारीक, फिर्यादी अनिल व द्वारकेश पारीक यांच्यावर
जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. शहर पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी पुढील तपास करत आहे.
