नाशिक मध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच राहणार

Cityline Media
0
द्वारका, सारडा सर्कल,गंजमाळ येथील ६० ठिकाणी कारवाई जोर

नाशिक दिनकर गायकवाड शहरातील वाहतूक कोंडी
सोडविण्यासाठी नाशिक महानगर पालिका व शहर पोलीस दलाच्या वतीने द्वारका व परिसरात अनाधिकृत बांधकामे, अतिक्रमणांवर कारवाईबी मोहीम हाती घेण्यात आली आहे. काल मोहीमेच्या तिसऱ्या दिवशी द्वारका सर्कल ते सारडा सर्कल तसेच शालिमार, गंजमाळ आदी भागातील एकूण ६० अतिक्रमणांवर बुलडोझर फिरविण्यात आले.
नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक डॉ. मनिषा खत्री, अति.आयुक्त स्मिता झगडे, अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे, पुर्व विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तात काल सकाळी ११ वाजेपासून ही अतिक्रमण हटाव मोहीम सुरु करण्यात आली. या कारवाईत अनाधिकृत फलक काढून अनाधिकृत बांधकामे तोहण्यात आली. तसेच या मार्गावरील टपऱ्या हटविण्यात आल्या. काही ठिकाणी नागरिकांनी या अतिक्रमण मोहीमेला विरोध दर्शविला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करून ही मोहीम नियमित सुरू ठेवली. रविवारी नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्तात द्वारका ते मुंबईनाका भागात जोरदार कारवाई करुन

८८ अतिक्रमणे जमीनदोस्त करुन पुढे वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे अनेक अतिक्रमणे काढण्यात येणार आहे
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!