श्रीरामपूर दिपक कदम श्रीरामपूर शहरातील सर्व छोट्या मोठ्या पाणी येणाऱ्या जाणाऱ्या पाईपलाईनची तपासणी करावी तसेच विविध मागण्यासाठी मंगळवार दिनांक १ जुलै रोजी सकाळी ११:०० वाजता रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली भव्य निदर्शने करणार असल्याची माहिती मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये यांनी दिली.
अशा आशयाचे निवेदन उपमुख्याधिकारी महेंद्र तापकिरे यांना शिवसेनेचे नेते संजय छल्लारे मा. उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे राष्ट्रीय जनसेवा पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड मा. नगरसेवक दीपक कुऱ्हाडे शेतकरी संघटनेचे डॉ.रोहित कुलकर्णी यांना दिले आहे
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आम्ही श्रीरामपूर शहरातील रहिवासी असून नगरपरिषदेचे करदाते आहोत आम्ही आजपर्यंत श्रीरामपूर नगर परिषदेवर डोळे झाकून विश्वास ठेवून लहान थोर सर्व श्रीरामपूरकर नगरपरिषदेचे पिण्याचे पाणी पीत आहे त्याच तलावात पाणी जाणाऱ्या पाईपलाईन वर किळसवाणा व संताप जनक प्रकार घडलेला आहे.
तो मानवी मैला पिण्याच्या पाण्यात मिसळून ते पाणी श्रीरामपूरच्या नागरिकांना प्यावे लागले त्यामुळे नगरपालिकेचे पाणी पिण्यासंदर्भात श्रीरामपूरकरांच्या मनात प्रश्न उपस्थित होऊन श्रीरामपूरातील जनतेच्या भावना तीव्र झाल्या असून तलावात जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या सिमेंटच्या मुख्यलाईनवर शौचालयचा मैला सोडण्यात आला होता.
त्या नीच प्रवृत्तीच्या कुटुंबावर श्रीरामपूर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी फिर्याद देऊन गुन्हे दाखल केले आहे परंतु त्यांनी केलेल्या दूषित पाण्यामुळे अनेक लोक आजारी पडून गंभीर स्वरूपाचे आजार झाले आहे म्हणून तज्ञ डॉक्टरांच्शशी चर्चा करून श्रीरामपूर शहरातील सर्व
लहान पासून ते वृद्ध लोकांची मोफत आरोग्य तपासणी नगरपरिषदेने करावी तसेच श्रीरामपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव रामभरोसे आहे त्या तलावाला वीस फुटाची संरक्षण भिंत बांधून तलावाच्या ठिकाणी सी.सी टि.व्ही कॅमेरे लावून त्या ठिकाणी
श्रीरामपूर नगर परिषदेने २४ तास वॉचमनचा पहारा द्यावा व पाटामध्ये दूषित सांडपाणी कचरा मैला टाकणाऱ्या नागरिकांचा बंदोबस्त करावा तसेच श्रीरामपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या छोट्या-मोठ्या पाईपलाईनची पाणीपुरवठा विभागामार्फत
त्वरित कसून तपासणी करून श्रीरामपूर शहराला दूषित व हागणदारीमुक्त शुद्ध पाणी देण्यात यावे या मागणीसाठी मंगळवार दिनांक १ जुलै रोजी सकाळी ११:०० वाजता श्रीरामपूर नगरपालिकेवर भव्य निदर्शने करण्यात येणार आहे तरी या निदर्शनाला श्रीरामपूर शहरातील ज्यांना दूषित पाणी येत असेल अशा नागरिकांनी पाण्याच्या बॉटल भरून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये राष्ट्रीय जनसेवा पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड यांनी केले आहे