राहुरी प्नतिनिधी येथील न्यायालयात गुहा पाट येथे झालेल्या एसटी बस व विद्यार्थिनी यांच्या अपघातातील एस.टी बस चालक याची नुकतीच राहुरी येथील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक १४ मार्च २०१६ ला सकाळी साडेसात वाजता फिर्यादीची मुलगी गुहा पाट येथील चिंचोलीत सायकलवर शाळेत गेली त्यावेळी गुहा फाट येथे नगर मनमाड रोडवर आरोपी यांनी सकाळी आठ वाजता आपल्या ताब्यातील बस नंबर १४ बी टी
३८३० ही हायगय,निष्काळजीपणा आणि अविचाराने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून फिर्यादीची मुलगी राहणार गुहा पाट हिस जोरात धडक देऊन गंभीर जखमी करत सायकलच्या नुकसानीस कारणीभूत झाला म्हणून राहुरी पोलिसांनी
आरोपी विरुद्ध नंबर १ /१००/१६ अन्वये भारतीय दंड विधान २७९,३३७ ३३८ ४२७ एम.व्ही.ॲक्ट १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तपास करून दोषारोप पत्र राहुरी न्यायालयात पाठवून दिले सदर खटल्यास एसएससी
नंबर ७७८/१६ असा नंबर प्राप्त झाला होता सदर खटला हा राहुरी येथील न्यायाधीश श्रीमती अनुपमा पारशेट्टी यांच्या समोर चालला सरकार तर्फे साक्षी पुरावा झाला व सबळ पुराव्या अभावी आरोपी नामे इम्रान रशीद खान पठाण याची दिनांक २४ जुन २०२५रोजी राहुरी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आरोपी तर्फे ज्येष्ठ विधिज्ञ व नोटरी पब्लिक अँड प्रकाश संसारे यांनी काम बघितले सदर खटल्याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले होते.