पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आश्वी खुर्द येथे घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटप

Cityline Media
0
आश्वी संजय गायकवाड- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आश्वी खुर्द येथील सुमारे ७० घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या धोरणानुसार सुमारे ३५० ब्रास वाळू मोफत वाटप केल्याने ग्रामपंचायत आश्वी खुर्दची लाभार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
अहमदाबाद येथील विमान अपघाताच्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा तथा अहिल्यानगर पालकमंत्री विखे पाटील यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय जाहीर करुन कोणतेही सत्कार सोहळे समारंभ आयोजित न कराता सामाजिक उपक्रम राबवावेत असे आवाहन केले होते त्या नुसार आश्वी खुर्द ग्रामपंचायतचे.प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ. अलका बापुसाहेब गायकवाड उपसरपंच बाबा भवर सर्व ग्रामपंचाय सदस्य ग्रामविकास अधिकारी प्रविण इल्हे कामगार तलाठी सुर्यकांत रणशुर ओमप्रकाश गाडेकर मंडळाअधिकारी अनिल आव्हाड यांच्या मार्फत संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संगमनेर तहसिलदार जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडे रितसर पत्रव्यवहार करत आश्वी खुर्द येथील शासकीय वाळु साठ्यातील शिल्लक वाळु स्थानिक घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या वाळु धोरणानुसार प्रत्यक घरकुल लाभार्थांना ५ ब्रास वाळू मोफत  मिळावी अशी मागणी प्रस्ताव  देऊन करत तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री व पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील मा.खा.सुजय विखे पाटील जि.प.मा.अध्यक्षा सौ.शालिनी विखे पाटील यांच्याकडेही या संदर्भात पाठपुरावा केला होता व त्यांनी यात विशेष लक्ष्य घातल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव मंजूर केला त्यामुळे आज नामदार विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वाळु वाटपाचा शुभारंभ सरपंच सौ. अलका गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी भाजप महिला जिल्हा अध्यक्षा सौ.कांचन राजेंद्र मांढरे विखे पाटील कारखान्याचे संचालक ॲड.अनिल भोसले ना. राधाकृष्ण विखे पा.यांचे स्विय सहाय्यक बापुसाहेब गायकवाड  दुध संस्थेचे अध्यक्ष मकरंद गुणे उपसरपंच बाबा भवर सामाजिक कार्यकर्ते विकास गायकवाड मोहीत गायकवाड ग्रा.प.सदस्य संजय भोसले सोपान सोनवणे सौ.कल्पना क्षिरसागर दुध संस्थेचे संचालक विजय गायकवाड रमेश सिनारे अशोक भोसले  कैलास गायकवाड मा. ग्रा.प.सदस्य संतोष भडकवाड दिपक सोनवणे इन्नुस सय्यद इसुब शेख सह मोठ्या प्रमाणात घरकुल लाभार्थी उपस्थित होते

-पालकमंत्र्यांची वाळू भेट दोन दिवसांत लाभार्थ्यांना मिळणार
आश्वी खुर्द ग्रा.प. कर्मचारी तलाठी कार्यालयातील कर्मचारी एकत्र येऊन स्थानिक ग्रामस्थांचे टॅक्टर अल्प भाडे तत्वावर घेऊन ५ ब्रास वाळु पुढील दोन ते तिन दिवसांत लाभार्थीच्या घरी पोहच करेल 
सौ.अलका गायकवाड सरपंच ग्रा.प. आश्वी खुर्द ता.संगमनेर
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!