मोकाट जनावरांसाठी सिडकोत बांधणार कोंडवाडा मनपाचा पन्नास लाख रुपयांचा मंजुरीसाठी प्रस्ताव
नाशिक दिनकर गायकवाड-शहर परिसरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या मोकाट जनावरांसाठी सिडकोत सुमारे ५० लाख रुपये खर्चून कोंडवाडा बांधण्यात येणार असून या प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीवर ठेवण्यात आला आहे.
सिडको, सातपूर, नाशिकरोड, पंचवटी, नाशिक पूर्व व नाशिक पश्चिम विभागात मोकाट जनावरोधी संख्या वाढत असून, नाशिक महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाकडून मोकाट जनावरे उचलण्यासाठी ठेकाही काढण्यात येतो.शहरात मोकाट जनावरांसाठी पंचवटी वगळता कुठेही निवारा व्यवस्था नाही.
सिडको विभागातील प्रभाग क्रमांक ३१ मधील सेंट्रल गोदामाजवळ मोकाट जनावरांसाठी हा कोंडवाडा तयार केला जाणार आहे. यासाठी ४९ लाख १० हजार ८५८ रुपये एवढा खर्च आहे. या कामाला तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. बांधकाम विभागाकडून
लवकर हे काम केले जाणार आहे. वा कामाची जागा नाशिक मनपाच्या ताब्यात असून, गौरव जाधव या ठेकेदाराची निविदा प्राकलन दरापेक्षा २४.८७ टक्के कमी दराने प्राप्त झाली आहे. शंभर जनावरांची सोय होईल, असा कोंडवाडा सिडकोत बांधला जाणार आहे. सद्यः स्थितीत रस्त्यावरच मोकाट जनावरे बसलेली असतात. पंचवटी विभागात मोकाट जनावरांसाठी निवारा शेड आहे.सिडकोत होणाऱ्या कोंडवाड्याच्या बांधकामासाठी ही पूर्वी प्रस्ताव दिला असून,त्यास आता मुहूर्त लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नाशिक शहराची लोकसंख्या पंचवीस लाखांच्या पुढे गेली असून, शहर बहूबाजूंनी वाढत असून सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकाम होत असल्याने नव-नवीन वसाहती होत आहेत. परंतु यासोबतच शहरातील मध्यवर्ती ठिकाणा बरोबरच उपनगरीय परिसरात मोकाट जनावरांचा प्रश्न बिकट बनतो आहे. ऐन शहराच्या
मध्यभागी, तसेच भाजी बाजारात मोकाट जनावरे बसलेली असतात. वाहनधारकांना वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागते. नाशिक महानगरपालिका हद्दीत मोकाट जनावरांसाठी राहाते सात कोंडवाड्यांची आवश्यकता आहे. विद्यमान परिस्थितीत पंचवटीतप कोंडवाडा असून, सिडकोत नव्याने कोंडवाडा उभारता जाणार आहे. पण नाशिकरोड, सातपूर, नाशिक पश्चिम व पूर्व या चारही विभागांत मोकाट जनावरांची संख्या पाहता या विभागांसाठी स्वतंत्र करेंहवाड्याची नितांत गरज आहे. नाशिक महानगरपालिका प्रशासन याकडे कधी लक्ष देणार,असा सवाल उपस्थित केला जात आहे
शहरात काही दिवसांपासून मोकाट जनावरांची संख्या वाढत आहे. अनेकवेळा काही जणांना दुखापतही झाली आहे. सिडकोत होणाऱ्या कोंडवाडयामुळे मोकाट जनावरांची सोय होणार आहे, असे मनपा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रदीप सोनवणे म्हणाले.
