नाशिक दिनकर गायकवाड वेबसाईटवर गेम खेळल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अज्ञात भामट्यांनी एका तरुणास ५ लाख ४ हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,फिर्यादी येनजु छबिलाल थापा (वय २३, रा. टागोरनगर, नाशिक) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. थापा हा नोकरी करतो.फिर्यादी ऑनलाईन गेम खेळत होता. स्थावेळी गेमिंग वेबसाईट तयार करणाऱ्या व्यक्तीने वेबसाईटवर गेम खेळल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले.
या गेमसाठी पैसे वर्ग करण्यासाठी बैंक खाते उपलब्ध करुन देणाऱ्या खातेधारकांनी आपापसात संगनमत करुन फिर्यादी थापा यांना ऑनलाईन जुगार खेळण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर फिर्यादी थापा यांनी वेबसाईटवर आरोपींकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या बैंक खात्यांवर सुमारे ५ लाख ४ हजार २४० रुपये वर्ग केले. तसेच ही रक्कम वर्ग झाल्यानंतर वेबसाईटवरील गेममध्ये विविध कारणांसाठी बोली लावली असता आरोपींनी जाणीवपूर्वक फिर्यादी थाबाला फसवण्याच्या उद्देशाने एकदाही जिंकू न देता, थापा यांची ५ लाख ४ हजार २४० रुपयांची फसवणूक केली.
याप्रकरणी सायबर पोलीस ताण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा प्रकार ९ ते २४ में दरम्यान घडला. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक उनके करीत आहेत.
