नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी लोकसभा मतदार संघातील राष्ट्रीय महामार्गासाठी तब्बल ६१०.२० कोटींची मंजुरी मिळाली असून, याबाबत खासदार भास्कर भगरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तसेच राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता.
दिंडोरी लोकसभा मतदार संघातील विविध रस्त्यांना शासनाने मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग ८८८ वरील नाशिक-पेठ या रस्त्याचे चौपदरीकरण करणे, यासाठी ३०१.२० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग ९५३ वरील कृषी उत्पन्न बाजार समिती
आवार कसबे वणी शहर ते पिंपळगाव बसवंत शहर रस्ता चौपदरीकरणासाठी २२८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग ३५३ वरील नांदगाव पेठ ते मोर्शी पंधुम या वनविभागासह शिल्लक अशा ७.१० कि.मी. रस्त्याचे मजबुती करणासाठी ८१
कोटी रुपयांचे मंजुरी करण्यात आले आहे. याबाबत खासदार भास्कर भगरे यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी तसेच राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून लवकरच त्याबद्दल खा. भगरे यांनी शासनाचे आभार मानले आहे.