विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव
संगमनेर नितीनचंद्र भालेराव वाढदिवस म्हटलं तर केक कापून,डीजे लावून गाजावाजा करत वाढदिवस साजरा केला जातो.परंतु असे न करता सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे संगमनेर भाजपा तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे यांनी कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.
तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन आणि केक कापून वाढदिवस साजरा केला.तसेच संगमनेर भाजपा तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे यांच्या ३८ व्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
राज्याचे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे,
विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे,संगमनेर तालुक्याचे आ.अमोल खताळ,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी फोन करून शुभेच्छांचा वर्षाव करत सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषद शाळा हिवरगाव पावसा येथे शालेय साहित्य वाटप प्रसंगी चिमुकल्यांचा आनंद गगनात मावेनासा झालेला दिसून येत होता.शाळा हे ज्ञानाचे मंदिर आहे या शाळेत अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन उच्च शिक्षण घेऊन देशाची सेवा,समाजाची सेवा करतात.शिक्षण हे वाघिणीचे दूध असून ते प्राशन केल्यानंतर गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.याच अनुषंगाने गणेश दवंगे यांनी इतर गोष्टीला फाटा देत शाळेतील विद्यार्थ्यांना वही,पेन वाटप करून वाढदिवस साजरा केला.
त्याप्रसंगी सरपंच सुभाष गडाख, उपसरपंच सुजाता दवंगे,माजी भाजप तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे,ओजस्वी भारत फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष उत्तम नाना जाधव,ग्राम विकास अधिकारी हरीश गडाख,
भाऊसाहेब बोऱ्हाडे,सचिन अरगडे,चंद्रकांत भालेराव, मुख्याध्यापक सुरेश नागरे यांच्यासह शाळेतील शिक्षक वृंद, विद्यार्थी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.