नेवासा प्नतिनिधी तालुक्यातील गणेशवाडी येथील शिव चिदंबर माध्यमिक विद्यालयात शनिवारी राष्ट्रीय योग दिनानिमित्त योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मुळा एज्युकेशन सोसायटीच्या सोनई कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत आयोजित या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून राष्ट्रीय योग दिन साजरा केला.या कार्यक्रमात महाविद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र लोहकरे व इतर शिक्षक रुंद व कृषीकन्यानी विद्यार्थ्यां समवेत विविध योगासने सादर केली. सूर्यनमस्कार,भुजंगासन,वज्रासन, ताडासन यासारख्या योगासनाचे महत्त्व व फायदे सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांनी योगासने अत्यंत शिस्तबद्ध व आनंददायी पद्धतीने सादर केली. या उपक्रमात कृषी तज्ञांनी मुलांसमोर प्रात्यक्षिक करून त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योगाचा उपयोग किती महत्त्वाचा आहे हे सांगितले शाळेतील शिक्षकांनीही योगाबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना दैनंदिन जीवनात योगाचे महत्त्व पटवून दिले
.योग दिनाच्या या कार्यक्रमास गावातील पालक विद्यार्थी आणि नागरिकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला संपूर्ण शाळेतील वातावरण योगमय झाले होते. लहान मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेला उत्साह आणि समाधान यांच्या सहभागातून दिसून येत होता. या कार्यक्रमासाठी कृषी कन्या चैताली मोटे, वृषाली जाधव,ऋतुजा गोयकर,प्रतीक्षा गायकवाड, सौंदर्या गायकवाड यांनी सहभाग घेतला होता.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हरि मोरे, उपप्राचार्य प्राध्यापक सुनील बोरुडे, समन्वयक डॉ.अतुल दरंदले व कार्यक्रम अधिकारी डॉ. निर्मला विधाते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. योग दिनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक मानसिक व नैतिक आरोग्याबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण करण्यात आली.