अहिल्यानगर दिपक कदम -शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रलेखन स्पर्धेमध्ये क्रांती वाघ, प्रथम,विनोद मस्के, द्वितीय तर दिपाली राजापुरे यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात येत”असल्याची माहिती राज्य कार्यकारणी सदस्य कवयित्री शर्मिला गोसावी यांनी दिली.
शालेय मुलांमध्ये पत्र लेखनाची आवड निर्माण व्हावी यासाठी शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने पत्रलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत ३५ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता.जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसह अहिल्यानगर शहरातूनही पत्र प्राप्त झाले होते.या स्पर्धेचे परीक्षण बबनराव गिरी, प्रशांत सूर्यवंशी व रवींद्र दानापुरे यांनी केले. यामध्ये प्रथम क्रमांक क्रांती वाघ, नगर, द्वितीय क्रमांक विबोध मस्के, तृतीय क्रमांक दिपाली भाऊसाहेब राजापुरे, नालेगाव यांना तर नंदिनी प्रवीण मुठे, समाधाननगर,आयुष उत्कर्ष गोसावी, बारामती, सानिध्या प्रसाद भडके, सावेडी,सन्मित्र सुनील कटारिया,पाथर्डी,शायन नईम शेख,आष्टी यांना उत्तेजनार्थ पारितोषिके जाहीर करण्यात येत आहेत.या सर्वांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुस्तके भेट देण्यात येणार आहेत.
शनिवार दिनांक २१ जून २०२५ रोजी दुपारी चार वाजता कोहिनूर मंगल कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.अशी माहिती शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी दिली.पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी,अध्यक्ष राजेंद्र उदागे, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, खजिनदार भगवान राऊत, कार्यवाह भारत गाडेकर,राज्य संघटक प्रा.डॉ.अशोक कानडे,उपाध्यक्ष डॉ.जी.पी.ढाकणे,जयश्री झरेकर,प्रा.डॉ. तुकाराम गोंदकर,स्वाती ठुबे,डॉ.अनिल गर्जे,राजेंद्र फंड,सुभाष सोनवणे,अरुण आहेर,शर्मिला गोसावी,राजेंद्र पवार,शिरीष जाधव यांनी अभिनंदन केले आहे.
