पुणे सिटीलाईन न्यूज नेटवर्क महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते पुण्याच्या सारथी संस्थेच्या मुख्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेमार्फत (सारथी) सत्कार करण्यात आला.
अजित पवारांनी सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करत त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी 'विजयी भव' या सारथी माहिती पुस्तिकांच्या प्रकाशनाचा कार्यक्रम देखील पार पडला
सामाजिक न्यायाचे प्रतीक म्हणून राज्यात आणि देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना ओळखलं जातं. आपल्या राज्यातील शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य क्षेत्राला प्रोत्साहन कसं द्यायचं, सर्व समाज घटकाचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास कसा साधायचा, याचा आदर्श वस्तूपाठ शाहू महाराजांनी सव्वाशे वर्षांपूर्वी घालून दिला. आज त्यांचं कार्य, विचार पुढे घेऊन जाण्याचं काम आपण सर्वजण करत आहोत, असे प्रतिपादन यावेळी व मुख्यमंत्र्यांनी केले.
तसेच "सारथी संस्थेचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्या सर्वांना त्याकरता प्रयत्न करावा लागणार आहे.छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला साजेशी कामगिरी सारथी संस्थेकडून झाली पाहिजे. यामध्ये माझी जी भूमिका असेल त्यात मी कुठेही कमी पडणार नाही, असा शब्द यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिला.