संगमनेर प्रतिनिधी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यातून सेवानिवृत्त झालेल्या सात कर्मचाऱ्यांचा सत्कार आज मा.मंत्री, बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी थोरातांनी सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आनंदी व आरोग्यदायी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या सेवाकाळातील निष्ठा, प्रामाणिकपणा आणि उल्लेखनीय कार्याची स्तुती केली.कारखान्याच्या प्रगतीत या कर्मचाऱ्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील, असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी कारखान्याचे . उपाध्यक्ष पांडुरंग घूले, सर्व संचालक मंडळ, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य व कार्यकारी संचालक जे.बी.घुगरकर तसेच सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.