नाशिक दिनकर गायकवाड घराच्या बांधकामासाठी माहेरून पाच लाख रुपये आणले माहीत म्हणून विवाहितेचा छळ केल्यावरणी पतिसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,की फिर्यादी विवाहिता हिचे पंचवटी परिसरात माहेर आहे. ही विवाहिता दि. १३ मे २०२४ ते ३ जानेवारी २०२५ या कालावधीत दिंडोरी येथे सासरी नांदत होती, त्यावेळी पती, सासू, सासरे नणंद्र यांनी संगनमत करून विवाहिते कडून धराच्या बांधकामासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली असता विवाहितेने त्यास नकार दिला.
याचा राग आल्याने फिर्यादीच्या विरुद्ध तिथे अंगावरील दागिने काढून घेत तिचा वेळोवेळी छळ केला, तसेच मारहाण, शिवीगाळ, तसेच दमदाटी करून तिला घरातून काढून दिले. या छळाला कंटाळून अखेर पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पतीसह चार जणांविन्द्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार सानप करीत आहेत.