नाशिक दिनकर गायकवाड नाशिक शहर पोलीस
आयुक्तालयाच्या पोलीस आयुक्त आपल्या दारी उपक्रमांतर्गत इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वतीने आनंदनगर पोलीस चौकी नागरिकांशी संवाद साधणारा कार्यक्रम पार पडला.
या उपक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपयुक्त प्रशांत बाच्छाव उपस्थित होते.त्यांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ते संजय नवले, भगवान दोंदे, अनिल गायकवाड संघमित्रा बहुउदेशीय संस्थेच्या पदाधिका-यांनी केला इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावणे यांचा सत्कार ज्योती गायकवाड व सविता पवार यांनी महिलांच्या वतीने केला.
या कार्यक्रमातील नागरी समस्यांवर भर देत अनिल गायकवाड ज्योती गायकवाड, माजी नगरसोवक भगवान दोंदे, संजय नवले,आणि मिलिंद बनसोडे यांनी आपल्या समस्या मांडल्या पोलीस आयुक्त आपल्या दारी या उपक्रमांतर्गत वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुप्ती सोनवणे यांनी देखील परिसरातील आडचणी तत्काळ सोडविण्याची ग्वाही दिली. या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक संतोष शिरसाठ पोलिस हवालदार अमोल मानकर जाधव गांगुर्डे यांच्यासह जितेंद्र चोरडिया, गणेश ठाकूर माहिती अधिकार कायदा जिल्हाध्यक्ष),देवीदास जगताप, भालेराव, सागर रामटेके, पद्म पानपाटील, कैलास दोंदे, सविता पवार आदी उपस्थित होते.