घरफोडीचा गुन्हा उघडकीस
नाशिक दिनकर गायकवाड नाशिक शहरातील घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याबाबत आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट २ च्या एका अट्टल चोरट्याला जेरबंद केले असून, त्याच्याकडून सोन्याचांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हेडगेवारनगर येथे एक महिन्यापूर्वी घराचा मागील दरवाजा उघडा असल्याची संधी साधून एक अनोळखी इसम घरात घुसला.त्याने लोखंडी कपाट उघडून लॉकरमधील सोन्याचांदीचे दागिने चोरले. या प्रकरणी अंबड पोलीस वाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस हवालदार नंदकुमार नांदुडर्डीकर, प्रकाश महाजन व मनोज परदेशी यांना एक इसम हेडगेवारनगर परिसरात चोरीचे दागिने विक्रीस आणणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे आणि प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा युनिट-२ चे पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी सापळा रचून उंटवाडी येथील अमरधाम जवळून संशयितास ताब्यात घेतले. या गुन्ह्यातील तपासा दरम्यान आरोपीने स्वतःचे नाव स्वप्नील संजय पवार (वय १९, रा. पाटीलनगर, नवीन सिडको, नाशिक) असे सांगितले असून, पंचांसमक्ष त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून ३८ हजार ३५० रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने जप्त करण्यात आले.
त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने अंबड पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा उघडकीस आला असून,आरोपीस पुढील कारवाईसाठी अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट-२ चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, शंकर काळे, सुहास क्षीरसागर, पोलीत्त हवालदार संजय सानप, सुनील आहेर, बंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, वाल्मीक चव्हाण, मनोज परदेशी, प्रवीण वानखेडे आणि संजय पोटिंद यांनी केली.
