केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाचे नवीन प्रोजेक्टद्वारे अडचणी सोडविण्याचे आदेश- राहुल ढेंबरे पा.
संगमनेर प्नतिनिधी तालुक्याच्या पठार भागातील विशेषतःडोंगरी भागातील कुंभारवाडी(वरवंडी) तसेच जोंधळवाडी(दरेवाडी) परिसरातील नागरिकांना नेटवर्क उपलब्ध नसल्याने खूप अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे स्थानिक नागरिक तसेच शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष राहुल ढेंबरे पा.यांनी पाठपुरावा करताच त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे आणि केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने नवीन प्रोजेक्ट द्वारे येथील अडचणी सोडविण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती राहुल ढेंबरे यांनी दिली.
शिवप्रतिष्ठाणच्या माध्यमातून त्यांनी सर्व आजी/माजी लोकप्रतिनिधी, पालकमंत्री,उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल,प्रधानमंत्री,राष्ट्रपती यांच्या बरोबरच दूरसंचारमंत्री नामदार ज्योतिरादित्य सिंधिया यांना निवेदनामार्फत कळविले होते.त्यावर उपाय योजना म्हणून टेलिकॉम कंपन्यां मार्फत सर्वेक्षण करण्यात आले, परंतु संबंधितांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता दूरसंचार मंत्रालयाला चुकीचा अहवाल सादर केल्याचे केंद्रीय दूरसंचार मंत्रालया बरोबरच केंद्रीय दूरसंचार मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यांनतर केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने टेलिकॉम कंपन्यांना संबंधित गावांचा नेटवर्क समस्येचा प्रश्न सोडविण्यासाठी कुंभारवाडीला नवीन प्रोजेक्ट मध्ये समाविष्ट करण्याचे आदेश नुकतेच दिले असल्याचे केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने कळविले आहे, परंतु दरेवाडी मध्ये जरी जिओ कंपनीचा टॉवर असला तरी देखील दरेवाडीचाच भाग असलेल्या जोंधळवाडी परिसराला त्याचे नेटवर्क पोहचत नसल्याचे निदर्शनास आणून देत जोंधळवाडी परिसराचा देखील नवीन प्रोजेक्ट मध्ये समावेश करण्यात यावा अशी आग्रही मागणी केल्यानंतर संबंधित विभागाने यास अनुकूलता दाखवली असून लवकरच कुंभारवाडी,जोंधळवाडी संपुर्ण परिसर केंद्र शासनाच्या नवीन प्रोजेक्टच्या माध्यमातून नेटवर्क मध्ये येणार असल्याचे शिवप्रतिष्ठाण संघटनेचे अध्यक्ष राहुल ढेंबरे पा. यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
