कोपरगाव दिपक कदम येथील टिळक चौक प्रीमियर लीग विवेकभैय्या कोल्हे चषकाच्या चौथ्या पर्वाचे उद्घाटन समारंभ नुकताच विवेक कोल्हे यांच्या हस्ते अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले.
या स्पर्धेचे आयोजन अशोक लकारे, टिळक चौक क्रिकेट क्लब व खेळाडूंच्या वतीने करण्यात आले आहे. या वर्षी टिळकनगर चौक प्रीमियर लीग मध्ये परिसरातील तसेच आसपासच्या तालुक्यांतील खेळाडूंनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला असून एकूण १२ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.
उद्घाटन समारंभ प्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यामध्ये पराग संधान, दिलीप दारुणकर, श्री डी. आर. काले, विजय आढाव, रवींद्र पाठक, राजेंद्र सोनवणे, कैलास जाधव, रवींद्र रोहमारे, जितेंद्र रणशूर, अविनाश पाठक, राजेंद्र मेहेत्रे, जगदीश लकारे, सागर जाधव, पप्पू पडियार, रंजन जाधव, सोमनाथ म्हस्के, सोमनाथ गंगुले, कैलास शेळके, सुभाष परदेशी, रोहन दरपेल, रवींद्र लचुरे, फकिरमंहमद पहलवान, नरेंद्र लकारे, . सुजल चंदणशिव. अण्णा खरोटे. आकाश लकारे, यांचा समावेश होता.